मद्यधुंद दिग्दर्शकाने सगळ्यांसमोरच… सुपरहिट चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झीनत अमानसोबत भयंकर घडलं; ढसाढसा रडली…

बॉलिवूडच्या जुन्या आठवणींमध्ये अनेक रंजक किस्से दडलेले आहेत. अभिनेत्री जीनत अमान यांनी असाच एक धक्कादायक अनुभव सांगितला होता. एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अमिताभ बच्चन उशिरा पोहोचले, मात्र त्याचा राग जीनत अमान यांना सहन करावा लागला.

| Updated on: Nov 21, 2026 | 2:12 PM
1 / 5
70 च्या दशकात झीनत अमान यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात होती. देव आनंद, अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि विनोद खन्ना यांच्यासोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडत होती. आजही त्या सोशल मीडियावर जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करतात

70 च्या दशकात झीनत अमान यांची लोकप्रियता मोठ्या प्रमाणात होती. देव आनंद, अमिताभ बच्चन, शशी कपूर आणि विनोद खन्ना यांच्यासोबत त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडत होती. आजही त्या सोशल मीडियावर जुन्या आठवणी चाहत्यांसोबत शेअर करतात

2 / 5

एका चित्रपटाच्या सकाळच्या शूटिंगसाठी जीनत अमान वेळेवर पोहोचल्या होत्या. प्रवासादरम्यान त्यांनी गाडीमध्येच आपल्या संवादांचा सराव केला होता. सेटवर पोहोचल्यानंतर अमिताभ बच्चन आल्यावर आपल्याला कळवावे, असे त्यांनी क्रूला सांगितले.

3 / 5

मात्र अमिताभ बच्चन सेटवर पोहोचण्यासाठी तब्बल 2 तास उशिरा झाले. ते आल्यानंतर जीनत अमान यांना शूटिंगसाठी बोलावण्यात आले. त्या सेटवर पोहोचताच दिग्दर्शकाने त्यांच्यावर राग व्यक्त करत सर्वांसमोर अपशब्द वापरले.

4 / 5

या प्रकारामुळे झीनत अमान यांना खूप वाईट वाटले आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. त्या आपले सामान आवरून असिस्टंटसोबत शूटिंग सोडून निघू लागल्या. त्यावेळी निर्मात्याने दिग्दर्शकाने मद्यपान केले असल्याचे सांगून त्यांची समजूत काढली.

5 / 5

यानंतर अमिताभ बच्चन यांनीही जीनत अमान यांची माफी मागितली. ते म्हणाले, "बेब्स, मैं जानता हूं ये मेरी गलती है। वो डायरेक्टर बेवकूफ़ आदमी है। उसने शराब भी पी रखी है। इग्नोर कर दो उसे। चलो, काम शुरू करते हैं।" दिग्दर्शकानेही त्यांच्या पाया पडून माफी मागितली, मात्र जीनत यांनी पुन्हा त्याच्यासोबत कधीही काम केले नाही. या किस्स्यातील चित्रपट आणि दिग्दर्शकाचे नाव सांगण्यास त्यांनी नकार दिला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us