
वृद्धापकाळात पाऊल ठेवताच महानायक अमिताभ बच्चन यांनी काही सवयी आणि गोष्टींपासून स्वतःला दूर केले जेणेकरून ते निरोगी राहतील. जाणून घ्या अमिताभ बच्चन यांनी कोणत्या गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवलं आहे.

अमिताभ बच्चन यांना मांसाहाराची आवड होती. पण वाढत्या वयानुसार त्यांनी मांसाहार पूर्णपणे सोडून दिला. बिग बींनी भातापासूनही स्वतःला दूर ठेवलं आहे. दुपारचे जेवण असो वा रात्रीचे जेवण, ते भात अजिबात खात नाही.

अमिताभ बच्चन दारू किंवा कोणत्याही प्रकारचे जंक फूड खात नाहीत. ते त्यांच्या कुटुंबातील कोणालाही जंक फूड खाऊ देत नाहीत.

अमिताभ बच्चन कायम घरी बनवलेलं अन्न खातात. त्यांच्या आहारात गोड पदार्थ नसतो. त्यांनी अनेक वर्षांपूर्वी गोड पदार्थ खाणं सोडून दिलं होतं.

अमिताभने त्याच्या दैनंदिन दिनचर्येत योग, ध्यान आणि व्यायामाला विशेष महत्त्व दिलं आहे. बिग बी रोज लवकर झोपतात आणि लवकर उठतात. एवढंच नाही तर, व्यस्त वेळापत्रकातून कुटुंबासाठी देखील वेळ काढत असतात.