Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीत वर्षभरात तब्बल 145% वाढ; आकडा पाहून विस्फारतील डोळे

Amitabh Bachchan: अमिताभ बच्चन हे मनोरंजन क्षेत्रातील दुसरे सर्वांत श्रीमंत सेलिब्रिटी बनले आहेत. गेल्या वर्षभरात त्यांच्या एकूण संपत्तीत 145% वाढ झाली आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा वाचून तुमचेही डोळे विस्फारतील.

| Updated on: Sep 24, 2026 | 10:52 AM
1 / 5
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव केवळ अभिनयाच्या विश्वातच नाही, तर त्यांच्या आर्थिक साम्राज्यामुळेही चर्चेत असतं. वयाच्या या टप्प्यावरही बिग बी चित्रपट, जाहिराती, गुंतवणूक आणि मालमत्तेच्या माध्यमातून सक्रिय आहेत. आता 'M3M हुरून इंडिया रिच लिस्ट 2026'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत समोर आलेली आकडेवारी चर्चेचा विषय ठरली आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचं नाव केवळ अभिनयाच्या विश्वातच नाही, तर त्यांच्या आर्थिक साम्राज्यामुळेही चर्चेत असतं. वयाच्या या टप्प्यावरही बिग बी चित्रपट, जाहिराती, गुंतवणूक आणि मालमत्तेच्या माध्यमातून सक्रिय आहेत. आता 'M3M हुरून इंडिया रिच लिस्ट 2026'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीबाबत समोर आलेली आकडेवारी चर्चेचा विषय ठरली आहे.

2 / 5

या रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन यांची संपत्ती सुमारे तब्बल 4000 कोटी रुपये झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी हीच संपत्ती सुमारे 1630 कोटी रुपये असल्याचं नमूद करण्यात आलं होतं. अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीत एका वर्षात मोठी वाढ झाली आहे. म्हणजेच अहवालातील आकडेवारीनुसार त्यांच्या संपत्तीत सुमारे 145 टक्क्यांची वाढ झाली आहे.

3 / 5

ही आकडेवारी केवळ चित्रपटांमधून मिळणाऱ्या मानधनावर आधारित नसून विविध गुंतवणुका आणि स्थावर मालमत्तेचाही त्यात समावेश असल्याचं अहवालांमध्ये नमूद करण्यात आलं आहे. अमिताभ बच्चन सक्रियपणे एखादा मोठा व्यावसायिक ब्रँड चालवत नसले तरी त्यांच्या फॅमिली ऑफिसच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचं सांगितलं जातं.

4 / 5

त्याचबरोबर रिअल इस्टेटमध्येही त्यांची मोठी गुंतवणूक आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण संपत्तीच्या अंदाजात व्यवसायातील गुंतवणूक, मालमत्ता आणि इतर आर्थिक स्रोतांचा समावेश होतो. मुंबईतील त्यांच्या मालमत्तांव्यतिरिक्त बच्चन कुटुंबाच्या रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीचीही अनेकदा चर्चा होत असते.

5 / 5

अमिताभ बच्चन यांचं वय वाढलं असलं तरी कामाच्या बाबतीत ते बरेच सक्रिय आहेत. चित्रपटांबरोबरच जाहिराती आणि इतर प्रोजेक्ट्समधून ते प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीमुळे मिळालेली ब्रँड व्हॅल्यू आणि अनेक दशकांतील आर्थिक गुंतवणुकीचाही त्यांच्या संपत्तीच्या वाढीत वाटा असल्याचं या आकडेवारीवरून दिसून येतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us