अमिताभ-रेखाचे हे चित्रपट प्रेक्षक कधीच पाहू शकणार नाहीत; एकच घटना दोनवेळा घडली, शूटिंग थांबवली आणि…
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री रेखा यांची जोडी एकेकाळी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली होती. या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की, या जोडीचा एक चित्रपट शूटिंग सुरू होऊनही कधीच प्रदर्शित झाला नाही.

अमिताभ बच्चन आणि रेखा यांची पहिली रिलीज झालेली फिल्म 'दो अनजाने' असल्याचे सांगितले जाते. हा चित्रपट 1976 मध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र, याआधी 1972 मध्ये दोघांनी एका चित्रपटासाठी एकत्र काम करण्यास होकार दिला होता.
बीबीसीच्या रिपोर्टनुसार, निर्माता जी. एम. रोशन आणि दिग्दर्शक कुंदन कुमार यांनी 'अपने-पराये' नावाचा चित्रपट सुरू केला होता. या चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रेखा मुख्य भूमिकेत होते. चित्रपटातील काही दृश्यांचे शूटिंगदेखील करण्यात आले होते.
मात्र, निर्मात्यांकडे पुरेसे पैसे नसल्यामुळे चित्रपटाचे काम संथ गतीने सुरू होते. त्याच काळात अमिताभ आणि रेखा यांना इतर मोठ्या चित्रपटांच्या ऑफर्स मिळू लागल्या. अखेर हा चित्रपट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.
Rekha amitabh movie
अमिताभ आणि रेखा शेवटचे 'सिलसिला' या चित्रपटात एकत्र दिसले होते. या चित्रपटात जया बच्चन यांचीही महत्त्वाची भूमिका होती. चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नसला, तरी आजही तो या जोडीच्या कारकिर्दीतील चर्चेचा विषय आहे. अपने पराय शिवाय टाईम मशीन हा चित्रपट देखील त्याच कारणांमुळे प्रदर्शित होऊ शकला नाही.