
बॉलिवूडमधील बच्चन कुटुंबीयांसाठी आजचा दिवस खूपस खास आहे. कारण आज 9 एप्रिल रोजी जया बच्चन या त्यांचा 76 वा वाढदिवस साजरा करत आहेत. जया बच्चन यांचा वाढदिवस संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी खूप खास अंदाजात साजरा केला.

जया बच्चन यांचे पती आणि बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे. बिग बींनी यानिमित्त एक ब्लॉग लिहिला आहे. त्यात त्यांनी लिहिलं, 'माझी अर्धांगिनी आज तिचा वाढदिवस साजरा करतेय. त्यानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी तुम्हा सर्वांचे आभार.'

या ब्लॉगमध्ये बिग बींनी हेसुद्धा सांगितलं की त्यांनी जया बच्चन यांचा वाढदिवस कसा साजरा केला? बिग बींनी लिहिलं, 'मध्यरात्री एक फॅमिली गेट टुगेदर झालं. कुटुंबीयांनी आमच्यावर प्रेमाचा वर्षाव केला.'

अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांच्या लग्नाला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांनी आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांमध्ये एकत्र काम केलंय. लग्नाच्या 50 वर्षांनंतरही जया आणि अमिताभ बच्चन यांच्या जोडीला इंडस्ट्रीतील 'पॉवर कपल' मानलं जातं.

जया बच्चन यांच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांकडूनही सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जया बच्चन या वयाच्या 76 व्या वर्षीही इंडस्ट्रीत सक्रिय आहेत. याचसोबत त्या राजकारणातही आहेत.