
अभिनेत्री अमृता खानविलकर नुकतीच आईवडिलांसोबत लंडन फिरायला गेली. या लंडन ट्रिपचे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. याच फोटोंवर कमेंट करत एका युजरने अमृताला तिच्या पतीविषयी प्रश्न विचारला.

'तू हिमांशूसोबत का फिरत नाहीस? आम्ही तुम्हाला एकत्र फिरताना खूप कमी वेळा पाहतो. तू नेहमी तुझ्या आई किंवा बहिणीसोबत फिरायला जाते. पण हिमांशू कुठेच दिसत नाही,' असं एका युजरने विचारलं.

अमृताने संबंधित युजरला उत्तर दिलं आहे. 'हिमांशू इन्स्टाग्राम फारसं वापरत नाही. त्याचं अकाऊंट आहे पण त्याठिकाणी तो स्वत:बद्दल फारसं काही शेअर करत नाही. तो कोणाला फॉलो करत नाही. त्यामुळे एकत्र फोटो टाकण्याचा प्रश्नच येत नाही. त्यापलीकडे जाऊन आम्हाला आमच्या आयुष्यातील काही गोष्टी प्रायव्हेट ठेवायला आवडतात.'

अमृताचा पती हिमांशू हा हिंदी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. 2015 मध्ये हिमांशूने अमृताशी लग्न केलं. त्यापूर्वी ते दहा ते बारा वर्षे एकमेकांना डेट करत होते.

हिमांशूला त्याचं खासगी आयुष्य खासगीच ठेवायला आवडतं, असं अमृताने अनेकदा सांगितलं होतं. म्हणूनच तो सोशल मीडियावर फारसं काही पोस्ट करत नाही.