ममता बॅनर्जी यांच्या TMC तून NCPI मध्ये फुटीर गेले, पण एनसीपीआय पक्ष नेमका कुठला, कोण त्याचे अध्यक्ष ?
ममता बॅनर्जी यांच्या 20 बंडखोर खासदारांनी नॅशनलिस्ट सिटिझन्स पार्टी ऑफ इंडिया (NCPI) मध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र हा एनसीपीआय पक्ष नेमका कोणता याची चर्चा देशभर सुरु आहे.

आधी ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाच्या बंडखोर नेत्यांनी स्वतंत्र गट स्थापन केला होता, मात्र, नंतर त्यांनी आता एनसीपीआय या पक्षात विलीन होण्याचा निर्णय काल जाहीर केल्याने खळबळ उडाली आहे.

एनसीपीआय ( NCPI ) हा नेमका कुठला पक्ष असा सवाल आता निर्माण झाला असून देशभरात या पक्षाची चर्चा सुरु आहे.

एनसीपीआय पक्षाची स्थापना जानेवारी २०२३ मध्ये निवडणूक आयोगाकडे ढाली आहे. या पक्षाचे मूळ जरी प.बंगालचे हावडा शहर असले. मात्र, त्यांनी त्रिपूरा या छोट्याश्या राज्यातून २०२३ च्या विधानसभा निवडणूकीत पहिले खाते उघडले होते. परंतू त्यांना अत्यंत नगण्य मते मिळाली.

या एनसीपीआय पक्षाचे निवडणूक चिन्ह शाईच्या पेनाची निब आणि सात प्रकाश किरणे असे आहे.

ममता बॅनर्जी यांनी एकीकडे कायदेशीर लढाईचा पवित्रा घेतला आहे, त्यातच कायदेशीर अडचणी आणि पक्षांतरबंदी कायद्यांतर्गत अपात्रतेची कारवाई टाळण्यासाठी टीएमसीच्या बंडखोर खासदारांनी एनसीपीआय (NCPI) मध्ये विलीनीकरणाची घोषणा केली.

आता बंडखोर खासदारांनी थेट एनडीएला पाठिंबा जाहीर करत मोठी खेळी केली आहे. त्यामुळे एनडीएच्या खासदारांची संख्या वाढणार असून संसदेत पावसाळी अधिवेशनात एक देश,एक निवडणूक आणि मतदार पुनर्रचना कायदा पास करण्यासाठी केंद्र सरकारने जमवाजमव केल्याचे म्हटले जात आहे.

एनसीपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष Uttiya Kundu आहेत. त्यांच्या पक्षाला आता तृणमुल बंडखोरांमुळे नवसंजीवणी मिळाल्याचे म्हटले जात आहे.