AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinesh Phogat: ब्रिजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगाट आक्रमक, थेट वॉर्निंग देत म्हणाली…

न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष मुक्त करून दिलासा दिला आहे. अपेक्षेप्रमाणे, ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारी महिला कुस्तीपटू विनेश फोगट या निर्णयावर नाराज आहे.

Vinesh Phogat: ब्रिजभूषण सिंह यांची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर विनेश फोगाट आक्रमक, थेट वॉर्निंग देत म्हणाली...
| Updated on: Aug 03, 2026 | 2:55 PM
Share

न्यायालयाने भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांना महिला कुस्तीपटूंवरील लैंगिक छळाच्या प्रकरणात निर्दोष मुक्त करून दिलासा दिला आहे. अपेक्षेप्रमाणे, ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारी महिला कुस्तीपटू विनेश फोगट या निर्णयावर नाराज असून, तिने या निर्णयाला आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्ली न्यायालयाने सहा महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या प्रकरणात ब्रिजभूषण यांची निर्दोष मुक्तता केली. विनेशने साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्यासोबत 2024 च्या सुरुवातीला ब्रिजभूषण यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले होते आणि जंतर मंतरवर निदर्शने केली होती.

न्यायालयाने जो निर्णय दिला तो ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या बाजूने दिला. यामुळे न्यायालयाच्या निर्णयानंतर, विनेशने इन्स्टाग्रामवर पोस्ट केली. या पोस्टमध्ये तिने न्यायालयाच्या निर्णयावर नाराज असल्याचे म्हटले आहे. तर या निर्णयाला आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. तिने लिहिले, “सत्ताधारी पक्षाच्या एका शक्तिशाली नेत्याविरुद्ध रस्त्यावर उतरून एफआयआर दाखल करण्यासाठी आम्हाला खूप धाडस लागले. आपल्या सत्तेचा आणि बाहुबली वापर करून, ब्रिजभूषणने अनेक मुलींना धमकावून त्यांची नावे मागे घ्यायला लावली. परंतु अनेक महिला कुस्तीपटू पुढे आल्या आणि न्यायालयात ब्रिजभूषणविरुद्ध लढा देत राहिल्या. महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक हिंसाचाराच्या आरोपांमध्ये न्यायालयाने ब्रिजभूषण शरण सिंग यांना दोषी ठरवले नाही, याचे आम्हाला तीव्र दुःख आहे. अगदी सुरुवातीपासूनच, संपूर्ण यंत्रणा, सरकार आणि स्वतः यंत्रणाही ब्रिजभूषणचे संरक्षण करण्यासाठीच काम करत आहे. महिला कुस्तीपटूंनी त्यांच्या वकिलांना या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचे निर्देश दिले आहेत आणि हे लवकरच केले जाईल. आम्ही आशा सोडलेली नाही. कुस्तीपटू आपला लढा सुरूच ठेवतील.”

बजरंग पुनिया यांनी निकालावर निराशा व्यक्त करत म्हटले, “आजच्या निर्णयावरून हे स्पष्ट झाले आहे की, सर्व सत्ता ब्रिज भूषण यांच्या हातात आहे. त्यांनी साक्षीदारांना हाताळले. आम्ही न्यायालयाचा आदेश शोधण्याचा प्रयत्न करत आहोत आणि कोणत्या आधारावर त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली हे आम्हाला समजत नाही.”

Follow Us
संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
मोठी बातमी! संजय राऊत यांच्या विरोधात फौजदारी अवमान याचिका दाखल; नेमकं प्रकरण काय?
अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य
Sachin Waze : साडेपाच वर्षांनी सचिन वाझेला जामीन! अँटिलिया प्रकरणानंतर आता दिशा सालियन प्रकरणावरही वाझेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
Thane | ठाणे मधील ठाकरे सेनेच्या विभाग प्रमुखाला संपवलं; नेमकं घडलं काय?
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट...
शिशू आहारासाठी तुकाराम मुढेंचे नवे नियम; चूक झाल्यास थेट... नेमकं काय सांगितलं?
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य
CM फडणवीसांच्या भेटीनंतर शिंदेंचे खासदार ओमराजेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ