
सनी देओल याचा गदर 2 हा चित्रपट मोठा धमाका करतोय. या चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड तोडले. या चित्रपटात सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत दिसले.

आता नुकताच गदर 2 चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी मोठा खुलासा केला. अनिल शर्मा यांनी थेट म्हटले की, गदर चित्रपटासाठी आमची पहिली पसंत ही अमीषा पटेल नव्हती.

माझ्या डोक्यात बऱ्याच अभिनेत्रींची नावे होती. मात्र, त्यातील दोन अभिनेत्रींनी तर चित्रपटाला थेट नकार देखील दिला. ऐश्वर्या राय आणि काजोल या पहिली पसंती होत्या.

अमीषा पटेल हिचे नाव अजिबातच या रेसमध्ये कधी नव्हते, असाही मोठा खुलासा करताना अनिल शर्मा हे दिसले आहेत. गदर चित्रपटानंतर अमीषा पटेल हिच्याकडे बऱ्याच चित्रपटांच्या आॅफर आल्या.

गदर हा चित्रपट सोडला तर अमीषा पटेल हिला इतर चित्रपटांमध्ये काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही. गदर 2 चित्रपटाने मोठा धमाका केलाय.