
रणबीर कपूर हा त्याच्या आगामी ॲनिमल चित्रपटामुळे चर्चेत आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा आहेत. या चित्रपटात रणबीर कपूर याच्यासोबत रश्मिका मंदाना ही मुख्य भूमिकेत धमाका करताना दिसत आहे.

ॲनिमल चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये मोठी क्रेझ बघायला मिळतंय. 1 डिसेंबरला हा चित्रपट रिलीज होतोय. त्यापूर्वीच चित्रपट हा ॲडव्हान्स बुकिंगमध्ये धमाका करताना दिसतोय

ॲनिमल चित्रपटाच्या रिलीजला सहा दिवस शिल्लक असतानाच 23,000 पेक्षाही अधिक तिकिटे चित्रपटाची विकली गेली आहेत. खरोखरच ही अत्यंत मोठी गोष्ट आहे.

ॲनिमल चित्रपटाला ॲडव्हान्स बुकिंगमध्ये प्रेक्षकांचा मोठा सकारात्मक प्रतिसाद हा मिळताना दिसतोय. चित्रपट ओपनिंगलाच 50 कोटींची कमाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.

दुसरीकडे रणबीर कपूर आणि रश्मिका मंदाना हे चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना देखील दिसत आहेत. आता पुढील काही दिवसांमध्ये चित्रपट काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरेल.