
बिग बाॅस 17 च्या घरात अंकिता लोखंडे आणि तिचा पती विकी जैन यांच्यामध्ये जोरदार वाद होताना दिसले. हेच नाही तर अनेक गंभीर आरोप दोघांनीही एकमेकांवर केले.

आता नुकताच विकी जैन याने सोशल मीडियावर काही खास फोटो शेअर केले. हे फोटो पाहून चाहते हैराण झाले. यामध्ये अंकिता लोखंडे ही कुटुंबासोबत सेलिब्रेशन करताना दिसतंय.

खास वेलकम पार्टीचे आयोजन अंकिता लोखंडे हिच्यासाठी ठेवण्यात आले. आता याच वेलकम पार्टीतील काही खास फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे या फोटोमध्ये खास पोझ देताना दिसत आहेत. दोघेही खूप जास्त खुश या फोटोंमध्ये दिसत आहेत. हे फोटो पाहून अनेक चर्चा सुरू झाल्या.

कुटुंबियांसोबत खास सेलिब्रेशन करण्याच्या अगोदर अंकिता लोखंडे आणि विकी जैन हे मित्र मैत्रिणींसोबत खास पार्टी करताना दिसले. अनेकांनी म्हटले की, बिग बाॅसच्या घरात हे भांडणाचे नाटक करत होते.