
कोरफड ही फक्त आरोग्यासाठीच नाही तर आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. कोरफडीमुळे त्वचेच्या अनेक मोठ्या समस्या दूर होण्यास मदत होते.

दररोज त्वचेवर कोरफड लावली तर तुमची त्वचा चमकदार आणि तजेलदार होण्यास मदत होते. शिवाय चेहऱ्यावरील काळोखा आणि सुरकुत्या जाण्यासही मदत होते.

जवळपास सर्वच लोकांना चेहऱ्यावरील सुरकुत्यांची मोठी समस्या आहे. मात्र, जर तुम्ही दररोज चेहऱ्यावर कोरफड लावली तर चेहऱ्यावरील सुरकुत्याची समस्या ही कायमची कमी होईल.

कोरफडीमध्ये अनेक घटक असतात जे त्वचेसाठी फायदेशीर आहेत. यामुळे कोरफड चेहऱ्यावर लावा आणि समस्या दूर करा. शक्यतो ताजी कोरफड लावणे अधिक फायदेशीर ठरते.

तुम्ही कोरफडीमध्ये हळद देखील मिक्स करू शकता. जर तुम्ही हळद मिक्स करून लावली तर त्वचा गोरी होण्यासही अधिक मदत होते.