
कोरफड ही आपल्या त्वचेसाठी आणि शरीरासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. ज्या लोकांन शुगरची समस्या आहे, त्यांनी जर कोरफडचे सेवन केले तर शुगरची समस्या कमी होते.

फक्त शरीरच नाही तर त्वचा आणि केसांसाठी देखील कोरफड ही फायदेशीर ठरते. जर चेहऱ्याला आपण कोरफड लावली तर त्वचेच्या अनेक समस्या या दूर होण्यास मदत होते.

तुम्हाला जर चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या असेल तर दररोज कोरफडीत हळद मिक्स करून लावा, यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

यासोबतच चेहऱ्यावर कोरफड लावल्याने चेहऱ्याची त्वचा ही मुलायम आणि तजेलदार राहण्यास मदत होते. केस गळण्याची समस्या असेल तर केसांना कोरफड लावा.

कधीही लक्षात ठेवा की, कोरफडीत हळद मिक्स करून चेहऱ्यावर लावल्याने अनेक फायदे होतात. त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात. (त्वचेचे काही आजार तुम्हाला असतील तर एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या)