
सलमान खानच्या कुटुंबात आता आनंदोत्सव साजरा केला जात आहे. कारण सलमान खानचा भाऊ अभिनेता तथा निर्माता अरबाज खानला मुलगी झाली आहे. अरबाज खानची पत्नी शुरा खानने तीन दिवसांआधी म्हणजेच 5 ऑक्टोबर रोजी मुलीला जन्म दिला आहे.

शुरा खानला आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. शुरा खानला डिस्चार्ज मिळाल्यानंतर आता अरबाज आणि शुरा या दोघांनीही आपल्या मुलीचे नाव सार्वजनिक केले आहे. दोघांनीही एकत्रितपणे इन्स्टाग्रावर या नावाची घोषणा केली आहे.

अरबाज आणि शुरा यांनी आपल्या मुलीचे नाव शिपारा असे ठेवले आहे. दोघांनीही इन्स्टाग्राम पोस्टमध्ये 'वेलकम बेबी गर्ल शिपारा' असे म्हटले आहे. दोघांनीही मुलगी झाल्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

दरम्यान, अरबाज आणि शुरा यांनी 2023 साली लग्न केले होते. या लग्नाला खान कुटुंबीय तसेच इतर जळवचे नातेवाईक उपस्थित होते. लग्नानंतर या कपलने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले होते.

शुरा आणि अरबाज यांच्या लग्नाचा वाढदिवस लवकरच येणार आहे. या वाढदिवसाआधीच त्यांच्या घरी छोट्या मुलीचा जन्म झाला आहे. अरबाज खानचे हे दुसरे लग्न आहे. त्याच्या पहिल्या पत्नीचे नाव मलायका अरोरा असे आहे.