
देशातील रेल्वेमार्गावर अनेक नावाची रेल्वे स्थानकं आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की 'सचिन' आणि 'कोहली' नावाचे रेल्वे स्टेशन देखील अस्तित्वात आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

देशातील रेल्वेमार्गावर अनेक नावाची रेल्वे स्थानकं आहेत. पण तुम्हाला हे माहिती आहे का की 'सचिन' आणि 'कोहली' नावाचे रेल्वे स्टेशन देखील अस्तित्वात आहे, हे फार कमी लोकांना माहिती आहे.

आजपर्यंत सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहली या दोघांनीही त्यांच्या नावाच्या या रेल्वे स्थानकाला कधी भेट दिल्याचे ऐकलेले नाही किंवा तेथे जाऊन फोटोसेशन वगैरे केलेले नाही.

या रेल्वे स्थानकांना सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांची नावे देण्यात आलेली नाहीत. हा केवळ योगायोग आहे. त्यांचा आणि स्थानकाच्या नावाचा तसा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही

'सचिन' आणि 'कोहली' ही दोन्ही रेल्वे स्थानके सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या जन्मापूर्वीची आहेत. याचा अर्थ असा की सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांच्या लोकप्रियतेमुळे या रेल्वे स्थानकांना ही नावे देण्यात आलेली नाहीत.

'सचिन' नावाचे रेल्वे स्थानक गुजरातमधील सुरत शहरात आहे, तर 'कोहली' नावाचे रेल्वे स्थानक महाराष्ट्रातील मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात आहे.

भारतीय संघाचा स्टार फलंदाज कोहली याच्या आडनावासारखे असलेले कोहली रेल्वे स्टेशन नागपूर मध्य रेल्वे विभागांतर्गत भोपाळ-नागपूर विभागात आहे. हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील कलामेश्वर येथील येलकापर येथे राज्य महामार्ग २५० च्या शेजारी आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य: पीटीआय / गेटी / एक्स / इंस्टाग्राम)

भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी २०२३ मध्ये या सचिन नावाच्या रेल्वे स्टेशनला भेट दिली होती आणि तिथून एक फोटोही त्यांनी काढून मजा म्हणून शेअर केला होता.