आशा भोसलेंच्या आवाजातील मास्टर पीस, ऐकताच लोकं… 28 वर्षांपूर्वीचं हे धमकेदार गाणं ओळखा पाहू!

90च्या दशकातील गाण्यांची जादू आजही कायम आहे. त्यातीलच आशा भोसले यांच्या आवाजातील मास्टरपीस, 28 वर्षांपूर्वीच्या या गाण्याने आजही श्रोत्यांना थिरकायला भाग पाडते. ‘सपने में मिलती है’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे.

| Updated on: Sep 22, 2026 | 2:49 PM
1 / 5
‘सत्या’मधील गाजलेले गाणे    1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटातील ‘सपने में मिलती है’ हे गाणे विशेष गाजले. लग्न आणि पार्ट्यांमध्ये या गाण्यावर आजही डान्स केला जातो.

‘सत्या’मधील गाजलेले गाणे 1998 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सत्या’ चित्रपटातील ‘सपने में मिलती है’ हे गाणे विशेष गाजले. लग्न आणि पार्ट्यांमध्ये या गाण्यावर आजही डान्स केला जातो.

2 / 5

आशा भोसले आणि सुरेश वाडेकर हे गाणे आशा भोसले आणि सुरेश वाडेकर यांनी गायले आहे. गाण्यातील वेगळी लय आणि मजेदार शब्दांमुळे ते प्रेक्षकांच्या लक्षात राहिले.

3 / 5

विशाल भारद्वाज यांचे संगीत या गाण्याला विशाल भारद्वाज यांनी संगीत दिले असून, गुलजार यांनी शब्द लिहिले आहेत. लोकसंगीताचा प्रभाव आणि पारंपरिक वाद्यांचा वापर गाण्याला खास बनवतो.

4 / 5

कलाकारांवर चित्रित ‘सपने में मिलती है’ हे गाणे शेफाली शाह आणि मनोज बाजपेयी यांच्यावर चित्रित करण्यात आले होते. गाण्यातील देसी अंदाज आणि अभिनय प्रेक्षकांना आवडला.

5 / 5

‘सत्या’ ठरला मैलाचा दगड राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘सत्या’मध्ये जेडी चक्रवर्ती आणि उर्मिला मातोंडकर प्रमुख भूमिकेत होते. दमदार कथा आणि अभिनयामुळे चित्रपटाची आजही चर्चा होते.90च्या दशकातील अनेक गाण्यांप्रमाणे ‘सपने में मिलती है’ची लोकप्रियता आजही कायम आहे. आशा भोसले यांच्या आवाजामुळे आणि वेगळ्या संगीतामुळे हे गाणे आजही श्रोत्यांच्या आठवणीत आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us