Asia Cup 2025 : आतापर्यंत 11 वेळा डाव उलटलाय, आशिया कपमध्ये याच संघाकडून टीम इंडियाला सर्वात जास्त धोका
Asia Cup 2025 : आशिया कप टुर्नामेंटमध्ये यावेळी 8 टीम आहेत. यात एक भारतीय संघ आहे. आता प्रश्न हा आहे की, टीम इंडियाला सर्वात जास्त धोका कोणापासून आहे?. एकदा आकड्यांवर नजर मारुन समजून घ्या.

आशिया कपमध्ये सर्वात यशस्वी संघ कुठला असं विचारलं, तर पटकन टीम इंडियाच नाव घ्याल. पण यशस्वी संघालाही धोका असतो. आशिया कप 2025 मध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका आहे. (Photo: BCCI)

आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला तो एकमेव धोका श्रीलंकन संघाचा आहे. आशिया कप टुर्नामेंटमध्ये टीम इंडियाला आतापर्यंत 11 वेळा श्रीलंकन टीमनेच धक्का दिला आहे. म्हणजे हरवलं आहे. (Photo: BCCI)

भारत आणि श्रीलंकेची टीम आशिया कपच्या इतिहासात आतापर्यंत 23 वेळा आमने-सामने आली आहे. यात 12 वेळा भारत जिंकलाय. श्रीलंकेने 11 वेळा बाजी मारलीय. म्हणजे तगडा मुकाबला आहे. म्हणून टीम इंडियाला श्रीलंकेपासूनच धोका आहे. (Photo: BCCI)

आशिया कपमध्ये टीम इंडियाला अन्य दुसऱ्या कुठल्या टीमकडून तितका धोका नाहीय. बांग्लादेश विरुद्ध 13 सामने जिंकलेत. यात दोन पराभव आहेत. पाकिस्तान विरुद्ध 10 विजय आणि 6 पराभव आहेत. (Photo: BCCI)

यावेळी आशिया कपमध्ये 8 संघ आहेत. पाकिस्तान, श्रीलंका, बांग्लादेश सोडून अन्य कुठलाही संघ भारताविरुद्ध आशिया कपमध्ये विजय मिळवू शकलेला नाहीय. (Photo: BCCI)