Photo : एवढा मोठा आंबा कधीच पाहिला नसेल… चक्क माणदेशी हनुमान 2 किलोचा आंबा

सांगलीच्या आटपाडीतील आंबा महोत्सवात 2 किलो वजनाचा 'माणदेशी हनुमान आंबा' चर्चेचा विषय ठरला आहे. शेतकरी चंद्रकांत देवकुते यांनी विकसित केलेला हा विशाल आंबा नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. या अनोख्या आंब्यामुळे महोत्सव स्थळी गर्दी वाढली असून, त्याचे वजन आणि आकार सर्वांसाठी कुतूहलाचा विषय बनले आहे.

| Updated on: May 25, 2026 | 2:21 PM
1 / 5
सध्या आंब्याचा सीजन आहे. त्यामुळे बाजारात हापूसपासून पायरी ते गावठी आंब्यांपर्यंत विविध जातीचे आंबे बाजारात विक्रीसाठी आले आहेत. लोकही मोठ्या उत्साहाने आंब्यांवर ताव मारताना दिसत आहेत. पाहुणे आल्यानंतर आंबरस करण्यावर अनेकांचा भर आहे. शहर असो वा गाव प्रत्येक घरात आंबेच आंबे दिसत आहेत. त्यामुळे घराजवळून जाताना आंब्याचा सुंगध आल्याशिवाय राहत नाही.

2 / 5
बाजारात तर विविध जातीचे आंबे विक्रीला आले आहेत. त्यात पायरी, फळांचा राजा हापूससह विविध प्रकारचे आंबे आहेत. शिवाय गावठी आंब्यांचीही रेलचेल पाहायाला मिळत आहे. काही छोटे आंबे आणि काही मोठे आंबेही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. लोकही आपआपल्या आवडीचे आंबे विकत घेताना दिसत आहेत.

3 / 5
पण सांगलीमध्ये आजपर्यंत न पाहिलेला असा आंबा बाजारात विक्रीला आला आहे. सांगलीच्या आटपाडीमध्ये बाजार समिती आणि महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाने आयोजित केलेल्या आंबा मोहोत्सवाला प्रारंभ झाला आहे. यावेळी या मोहोत्सवांमध्ये माणदेशी हनुमान आंबा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. तब्बल 2 किलो वजनाचा हा हनुमान आंबा चर्चेचा विषय ठरला आहे.

4 / 5
2 किलो वजनाच्या हनुमान आंब्याची विशेष चर्चा आटपाडी तालुक्यात रंगली आहे. त्याचबरोबर केशर, देवगड, हापूस आणि विविध जातीचे आंबे विक्रीसाठी आंबा महोत्सवमध्ये दाखल झाले आहेत. मात्र, यापेक्षा हा दोन किलो वजनाचा हनुमान आंबा पाहण्याकडेच नागरिकांचा अधिक भर दिसत आहे. हा आंबा पाहण्यासाठी प्रदर्शनात मोठी गर्दी झाली आहे. अनेकांना त्याचं अप्रूपही वाटत आहे.

5 / 5
या आंबा महोत्सवाचे उद्घाटन काल करण्यात आले. हे प्रदर्शन पुढील चार दिवस चालू राहणार आहे. आटपाडी येथील शेतकऱ्याने माणदेशी या आंब्याचा वाण विकसित केला आहे. या आंब्याचे वाण शेतकऱ्यांमध्ये आणि ग्राहकाच्यात कुतुहुल चा विषय बनला आहे. शेतकरी चंद्रकांत देवकुते यांनी हा आंबा बाजारात विक्रीला आणला आहे.

Follow Us