ईदनिमित्त सलमान खानच्या ‘मुन्नी’चा खास लूक; नेटकरी पडले प्रेमात

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' या चित्रपटात चिमुकल्या मुन्नीची भूमिका साकारणारी अभिनेत्री हर्षाली मल्होत्रा आता 16 वर्षांची झाली आहे. हर्षाली आता खूपच सुंदर दिसत असून ईदनिमित्त तिने खास व्हिडीओ पोस्ट केला आहे.

| Updated on: Apr 11, 2024 | 2:16 PM
1 / 5
सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील मुन्नी तुम्हाला आठवतेय का? मुन्नीची भूमिका साकारून प्रेक्षकांची मनं जिंकणारी हर्षाली मल्होत्री आता 16 वर्षांची झाली आहे. सोशल मीडियावर ती सक्रिय असून तिचे इन्स्टाग्रामवर दोन दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.

2 / 5
ईदनिमित्त हर्षालीने इन्स्टाग्रामवर खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. यामध्ये तिचं सौंदर्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत. चांद नजर आया? असं कॅप्शन देत हर्षालीने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओच्या बॅकग्राऊंडमध्ये 'यूँ शबनमी' हे गाणं ऐकायला मिळतंय.

3 / 5
हर्षालीच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. 'चंद्र रीलमध्येच दिसला', असं एकाने म्हटलंय. तर चंद्राहूनही सुंदर तू आहेस, असं दुसऱ्या युजरने लिहिलं आहे. हर्षालीच्या या रीलला दोन लाखांहून अधिक लाइक्स आणि तीन दशलक्षांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

4 / 5
हर्षाली मल्होत्राला ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटातील मुन्नीच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा स्क्रीन अवॉर्ड आणि भारतरत्न डॉ. आंबेडकर अवॉर्ड मिळाला. या चित्रपटाशिवाय तिने ‘कुबुल है’ आणि ‘लौट आओ त्रिशा’ यांसारख्या मालिकांमध्येही भूमिका साकारल्या आहेत.

5 / 5
हर्षालीने स्वत:चा युट्यूब चॅनलसुद्धा सुरू केला आहे. त्यावरही ती विविध व्हिडीओ पोस्ट करत असते. मात्र अनेकदा तिला ट्रोलिंगचाही सामना करावा लागतो.