
भारत आणि बांग्लादेशमध्ये सध्या तणाव वाढला आहे. याची वेगवेगळी कारणं आहेत. त्यापैकी एक महत्वाचं कारण म्हणजे तिथे अल्पसंख्यक हिंदुंची होणारी हत्या. त्यामुळे दोन्ही देशातील क्रिकेट संबंध सुद्धा बिघडले आहेत. या दरम्यान बांग्लादेशने टी 20 वर्ल्ड कपसाठी आपल्या टीमची घोषणा केली आहे. त्यांनी एका हिंदू खेळाडूला टीमचं कॅप्टन बनवलं आहे. (Photo: PTI)

भारतासोबत वाद वाढत असताना बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने रविवारी 4 जानेवारी रोजी टी 20 वर्ल्ड कप 2026 साठी आपल्या टीमची घोषणा केली. टीमचं नेतृत्व पुन्हा एकदा स्टार विकेटकीपर फलंदाज लिट्टन दासकडे सोपवलं आहे. लिट्टन मागच्या काही काळापासून टी 20 टीमचा कॅप्टन आहे.(Photo: PTI)

लिट्टन दासच्या नेतृत्वाखाली बांग्लादेशी टीमने आशिया कप 2025 च्या सुपर 4 राऊंडमध्ये प्रवेश केला होता. पण त्यापुढे त्यांना जाता आलं नाही. त्यानंतर बांग्लादेशला घरच्या मैदानात वेस्ट इंडिजकडून 0-3 अशा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. आयर्लंड विरुद्ध त्यांनी 2-1 असा विजय मिळवला. (Photo: PTI)

बांग्लादेशी स्क्वॉडमध्ये त्या खेळाडूला सुद्धा स्थान मिळालय जो सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानला बीसीसीआयच्या सांगण्यावरुन KKR ने 3 जानेवारीला आपल्या स्क्वाडमधून रिलीज केलं. त्याला विरोध म्हणून 4 जानेवारी रोजी बांग्लादेशी क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कपसाठी भारतात टीम पाठवायला नकार दिला. (Photo: PTI)

बांग्लादेशच्या स्क्वॉडमधील 15 खेळाडू- लिट्टन दास (कॅप्टन), तनजीद हसन, परवेज होसैन, सैफ हसन, तौहीद ह्रदॉय, शमीम होसैन, नूरुल हसन, मेहदी हसन, रिशाद होसैन, नसुम अहमद, मुस्तफिजुर रहमान, तनजीम हसन साकिब, तस्कीन अहमद, मोहम्मद सैफुद्दीन, शोरीफुल इस्लाम (Photo: PTI)