
वास्तुशास्त्रानुसार, घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक विशिष्ट ऊर्जा असते. बाथरूम देखील त्याला अपवाद नाही. बाथरूममध्ये काही विशिष्ट वस्तू ठेवल्यास किंवा काही गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते.

यामुळे वास्तुदोष निर्माण होऊ शकतात. हे दोष घरातील शांती भंग करू शकतात आणि आर्थिक समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. या नकारात्मक उर्जेला टाळण्यासाठी, बाथरूममधून ताबडतोब काही गोष्टी काढून टाकायला हव्यात.

बाथरूममध्ये चुकूनही तुटलेली काच किंवा आरसा ठेवू नये. तुटलेल्या काचेमुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. यामुळे कुटुंबात आर्थिक समस्या आणि तणाव वाढू शकतो.

बाथरूममध्ये कधीही चप्पल उलटे ठेवू नका. तसेच तुटलेले आणि जीर्ण झालेले चप्पल बाथरूममध्ये ठेवणे टाळावे. चप्पल उलटे ठेवल्यास किंवा तुटलेले चप्पल बाथरूममध्ये ठेवल्याने घरात गंभीर वास्तुदोष निर्माण होऊ शकतात.

बाथरूममध्ये किंवा बाथरूमच्या अगदी आजूबाजूला कोणतेही झाड किंवा रोपटे ठेवणे वास्तुनुसार योग्य मानले जात नाही. बाथरूममधील दमट वातावरणात झाडे ठेवणे उर्जेच्या प्रवाहासाठी योग्य मानले जात नाही.

वापरलेले ओले कपडे बाथरूममध्ये जास्त वेळ ठेवू नका. तसेच कपड्यांचा ढीगही लावू नका. ओले कपडे तसेच ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतात. यामुळे घरात नकारात्मकता वाढू शकते. वापरलेले ओले कपडे त्वरित वाळवण्यासाठी घालावेत.

बाथरूममध्ये असलेली बादली किंवा टब (Tub) रिकामी ठेवू नये. बादली रिकामी ठेवणे हे घरात गरिबी आणि आर्थिक अडचणींना आमंत्रण देणारे मानले जाते.

बादली नेहमी पाण्याने भरलेली ठेवावी. शक्य नसल्यास, ती उलटी करून ठेवावी. वास्तूनुसार, निळ्या रंगाची बादली शुभ मानली जाते.