
चाळीशीमध्ये शरीरासोबतच त्वचेच्याही काही समस्या निर्माण होतात. अशावेळी काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. यादरम्यान काही टीप्स फॉलो केल्या तर ते फायदेशीर ठरेल.

चाळीशीमध्ये त्वचेची काळजी घेण्यासाठी बीट, गाजर आणि आवळ्याच्या ज्यूसचा आपल्या आहारात समावेश करा. हा ज्यूस फायदेशीर ठरतो.

दररोज तुम्ही जर गाजर, बीट आणि आवळ्याचा ज्यूस पिला तर त्वचेच्या असंख्य समस्या दूर होतात. मात्र, हा ज्यूस कायमच रिकाम्या पोटी प्या.

या ज्यूसमुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. फक्त हेच नाही तर चेहऱ्यावरील वांगही कमी होण्यास मदत होते. यामुळे हा ज्यूस फायदेशीर ठरतो.

चेहऱ्याची त्वचा लूज पडत असेल तर दिवसातून दोनदा हा ज्यूस प्या. कधी कधी या ज्यूसमध्ये फ्रेश कोरफड टाकूनही पिणे फायदेशीर आहे.