
मनाली, हिमाचल प्रदेश : जुलौ महिन्यात थंड वारा, नद्यांचा खळखळात आणि घनदाट जंगलांचा आनंद घेण्यासाठी तुम्ही हिमाचल प्रदेशातील मनालीला भेट देऊ शकता. या ठिकाणी हिडिंबा मंदिर, रोहतांग पास, सोलांग व्हॅली ही येथील प्रमुख भेट देण्याची ठिकाणे आहेत.

दार्जिलिंग, पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमधील दार्जिलिंग हे सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. जुलैमध्ये येथील हिरवळ आणि पाऊस तुमचा आनंद द्विगुणित करेल. टायगर हिलवरून सूर्योदय पाहणे, चहाच्या बागेत फिरणे, जलपाईगुडीहून टॉय ट्रेनचा प्रवास या उपक्रमांमध्ये तुम्ही सहभागी घेऊ शकता.

लेह-लडाख : जुलैमध्ये लेह-लडाखमधील बर्फ वितळतो, त्यामुळे या भागातील रस्ते उघडतात. त्यामळे तुम्ही लडाखला भेट देण्याची योजना आखू शकता. पँगोंग तलाव, खारदुंग ला पास, लेह बाजार, ठिक्से मठ हे या भागातील प्रमुख भेट देण्याची ठिकाणे आहेत.

शिमला, हिमाचल प्रदेश : जुलैमध्ये पडणााऱ्या पावसामुळे शिमला या हिल स्टेशनचे सौंदर्यं आणखी वाढते. येथील हिरव्या दऱ्या लक्ष वेधून घेतात. रिज पार्क, जाखू मंदिर, मॉल रोड ही काही प्रमुख ठिकाणे खास आहेत. त्यामुळे या हिल स्टेशनला तुम्ही भेट देऊ शकता.

कोवलम, केरळ : तुम्हाला मान्सूनच्या पावसात समुद्र किनाऱ्याचे सौंदर्य अनुभवायचे असेल तर तुम्ही केरळमधील कोवलमला नक्की भेट द्या. कोवलम बीच, लाइटहाऊस, बॅकवॉटर टूर ही या ठिकाणाची प्रमुख आकर्षणे आहेत.