
मुंबईत 25 व्या ITA अवॉर्ड्सची शानदार सुरुवात झाली. फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतले मोठे स्टार्स या कार्यक्रमात सहभागी झाले होते. धुरंधर चित्रपटात राजकारणी रंगवणारे जमील जमाली म्हणजे राकेश बेदी या पुरस्कार सोहळ्यात सहभागी झालेले. रेड कार्पेटवर त्यांनी पॅप्सना पोझ दिल्या.

यावेळी त्यांची भेट 'भाभी जी घर पर है' मधल्या अंगूरी भाभी म्हणजे शुभांगी अत्रेशी झाली. दोघांनी परस्परांना ग्रीट केलं. दोघे एकत्र पॅप्सना पोझ देत होते. पण त्यावेळी असं काही घडलं की, शुभांगी अनकंफर्टेबल झाली.

दोघे एकत्र पोझ देत असताना राकेश बेदी यांनी अभिनेत्रीच्या खांद्यावर हात ठेवला. राकेश यांनी ज्या पद्धतीने शुभांगीला पकडलेलं, त्यामुळे ती अस्वस्थ झाली.

तिने तात्काळ राकेश यांचा हात आपल्या खांद्यावरुन हटवला. त्यावेळी शुभांगीच्या चेहऱ्यावर हास्य कायम होते. दोघांनी पुन्हा पोझ दिली. शुभांगीने ज्या पद्धतीने परिस्थिती हाताळली. त्याचं लोकांनी कौतुक केलं. अनेकांनी राकेश यांना ट्रोल केलं.

पण अनेक युजर्सच असं म्हणणं होतं की, त्यांचं इंटेशन चुकीच नसावं. अजाणतेपणी त्यांनी खांद्यावर हात ठेवला असावा. राकेश बेदी धुरंधर चित्रपटानंतर चर्चेत आहेत. जमील जमाली या राजकारण्याचा रोल त्यांनी उत्तमरित्या साकारला आहे.