
साडेतीनशे वर्षांपूर्वीची परंपरा कायम राखत आज भेंडवळ येथे भाकीत वर्तविण्यात आले आहे, अक्षय तृतीयेच्या पूर्वसंधेला ही घट मांडणी करण्यात आली, त्यानंतर आज अक्षय तृतीयेच्या दुसऱ्या दिवशी भाकीत वर्तवण्यात आले आहे. सारंगधर महाराज वाघ यांनी हे भाकीत वर्तवलं आहे.

साधारणपणे चालू वर्ष कसं असणार आहे, पावसाचं प्रमाण कसं राहील, पीक पाण्याची परिस्थिती काय असणार आहे? देशात राजकीय परिस्थिती कशी असणार आहे, काही संकट येणार आहे का? अशा स्वरुपाचं भाकीत हे भेंडवळ येथे वर्तवण्यात येतं.

भेंडवळमध्ये अक्षय तृतीयेच्या पूर्वसंधेला ही घट मांडणी करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसर्या दिवशी भाकीत वर्तवण्यात आलं आहे. यावर्षी पाऊस सर्वसाधारण असणार आहे, असं भाकीत भेंडवळच्या घट मांडणीमध्ये वर्तवण्यात आलं आहे.

मान्सूनच्या पहिल्या महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील, दुसऱ्या महिन्यात चांगला पाऊस होईल, तिसऱ्या महिन्यात पावसाचं प्रमाण कमी असेल, तर चौथ्या महिन्यात अवकाळी पावसाचा फटका बसेल असं भेंडवळच्या घट मांडणीनंतर वर्तवण्यात आलं आहे.

पिकांची स्थिती कशी असणार? याबाबत देखील भाकीत वर्तवण्यात आलं आहे, कपाशीचं पीक यावर्षी अनिश्चित असणार, तुरीचं पीक देखील अनिश्चित असणार आहे. तर मूग आणि उडिदाचं पीक सर्वासाधरण येईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे.

दरम्यान सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाचं वातावरण आहे, त्यामुळे युद्ध होणार का याबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे. याबाबत देखील मोठं भाकीत भेंडवळच्या घट मांडणीत वर्तवण्यात आलं आहे. सीमेवर तणावाची स्थिती राहील असं म्हटलं आहे.

राजा म्हणजेच पंतप्रधान तणावात राहातील, परकीयांचा त्रास होईल मात्र संरक्षण खातं मजबूत आहे. युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल, मात्र युद्ध होणार नाही, असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे. डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.