Bigg Boss : 15 वर्षांपासून सलमानच्या शोचा खास आवाज, ‘Bigg Boss’ ची कमाई किती ?

Voice Of Bigg Boss Vijay Vikram Singh : अभिनेता सलमान खानच्या बिग बॉसचा 19 वा सीझन सुरू आहे. नेहमीप्रमाणे या सीझनलादेखील चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असून लोकांना तो खूप आवडतोय. गेल्या 15 वर्षांपासून, या शोमध्ये एक माणूस पडद्यामागे राहून सर्वांचे मनोरंजन करतो. बिग बॉसचा आवाज असलेला हा इसम कोण आणि त्याची कमाई किती ते जाणून घेऊया.

| Updated on: Oct 20, 2025 | 8:47 AM
1 / 6
सलमान खानचा शो, बिग बॉस, आज देशातील सर्वात यशस्वी रिॲलिटी शोंपैकी एक आहे. या शोचे प्रचंड चाहते आहेत. हा शो फक्त भारतातच नव्हे तर परदेशातही लोकप्रिय आहे. गेल्या दोन दशकांमध्ये, असंख्य सेलिब्रिटी या शोचा भाग राहिले होते आणि त्याचसौोबत अनेक होस्टही या शोने पाहिले आहेत. पण पडद्यामागे एक आवाज असा देखील आहे जो बऱ्याच काळापासून ठामपणे या शोचा भाग आहे आणि आत्तापर्यंत तो (आवाज) कधीच रिप्लेस झालेला नाही.

2 / 6
तो आवाज म्हणजे विजय विक्रम सिंग यांचा. विजय गेल्या दीड दशकापासून बिग बॉसशी जोडलेले आहेत,  पण त्यांच्याबद्दलची खास गोष्ट म्हणजे ते या शो दरम्यान कधीही पडद्यावर दिसले नाहीत. मात्र, तुम्ही त्यांचा आवाज नक्कीच ऐकला असेल. ते पडद्याआडूनच टास्क आणि सूचाना देताना दिसतात. 2010 साली बिग बॉसच्या चौथ्या सीझनदरम्यान त्यांनी एंट्री केली.

3 / 6
ते बऱ्याच काळापासून या शोचा भाग आहेत. बिग बॉसमधील स्पर्धक आणि होस्ट, यांच्या फीबद्दल नेहमीच चर्चा होत असली तरी, बिग बॉसचा आवाज असलेले विजय विक्रम सिंग, यांच्या फीबद्दल फार कमी लोकांना कल्पना असेल. आता, विजयने स्वतः याबद्दल भाष्य केलं आहे.

4 / 6
बिग बॉसमधील त्यांच्या कमाईबद्दल बोलताना विजय म्हणाले - मी बिग बॉसपेक्षा तर कमी पैसे कमवतो पण बिग बॉसमुळे मी खूप पैसे कमवतो. सुरुवातीला, जेव्हा मी या शोमध्ये नवीन होतो, तेव्हा माझा वापर झाला. पण नंतर, जेव्हा मी शोमध्ये तीन वेळा पैसे वाढवून मागितले तेव्हा प्रत्येक वेळी माझा पगार वाढवला गेला.

5 / 6
बिग बॉसचा आवाज म्हणून प्रसिद्ध असलेले विजय यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, त्यांची कारकीर्द बिग बॉसपुरती मर्यादित राहिलेली नाही. त्यांनी अभिनेता म्हणूनही स्वतःला एक्सप्लोर केले आहे. 2019 साली ते मनोज वाजपेयींच्या 'द फॅमिली मॅन' या मालिकेतही होते. तसेच  'ब्रीद 2', 'मिर्झापूर 2' आणि 'स्पेशल ऑप्स 1.5' सारख्या लोकप्रिय आणि हिट वेब सिरीजमध्येही ते झळकले आहेत.

6 / 6
सलमान खानच्या शो बिग बॉसबद्दल सांगायचं झालं तर सध्या 19 वा सीझन सुरू झाला आहे. हा सीझन मागील सीझनपेक्षा जास्त मोठा आहे. कुनिका सदानंद, तान्या मित्तल, अमाल मलिक आणि इतर स्टार्स या शोमध्ये झळकत आहेत.