Sharad Kapoor: मुख्यमंत्र्यांच्या नातीशी लग्न केलं, कोट्यवधींची संपत्ती… आज वाईट अवस्था, का ओढावली अशी परिस्थिती?
Sharad Kapoor: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शरद कपूरची वाईट अवस्था झाली आहे. तो एका खोलीमध्ये राहात असल्याचे दिसत आहे. त्याची पत्नी मुख्यमंत्र्यांची नात आहे. पण सध्या ओढावलेल्या परिस्थितीमागील नेमकं कारण काय आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

९०च्या दशकात आणि २०००च्या सुरुवातीला आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूड अभिनेता शरद कपूर सध्या चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून अक्षरश: डोळ्यात पाणी येत आहे. पण कोट्यवधींची संपत्ती असलेल्या अभिनेत्यावर अशी परिस्थिती का ओढावली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
शरद कपूर ९०च्या दशकातील त्या निवडक अभिनेत्यांपैकी एक होते, ज्यांनी हिरोसोबतच ग्रे आणि नेगेटिव्ह शेड्स असलेल्या भूमिकांमध्ये जबरदस्त लोकप्रियता मिळवली. चित्रपट ‘दस्तक’मधील एका वेड्या आणि ‘सायको लव्हर’ची भूमिका असो किंवा ‘जोश’मधील प्रकाश शर्माची दमदार भूमिका, शरद कपूर यांची स्क्रीन प्रेजन्स नेहमीच चर्चेत राहिली.
वैयक्तिक जीवनाबाबत बोलायचे झाले तर त्यांनी पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या नातशी कोयल बसूशी लग्न केले होते. एकेकाळी शरद कपूरकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती होती. पण सध्या त्याच्यावर कठीण परिस्थिती ओढावली आहे.
दीर्घकाळ चित्रपटसृष्टीच्या झगमगाटापासून थोडे दूर राहिलेला शरद कपूर आता खूपच अशक्त दिसत आहे. त्याचा हा लूक पाहून त्याला ओळखणेनेही कठीण झाले आहे. त्याच्याकडे असलेले पैसे काय झाले? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये शरद कपूर हा एका बंद खोलीमध्ये राहात असल्याचे दिसत आहे. संपूर्ण खोली ही अंधारी आहे. खोलीमध्ये स्वच्छता नाही. तेथेच त्यांचे पाळीव कुत्रे देखील दिसत आहेत. त्यांच्यासोबत घरात त्यांची पत्नी आणि लहान बाळ देखील असल्याचे समोर आले आहे. आता