Bollywood Celebrities : ॲक्टर्स बनले डायरेक्टर… या अभिनेत्यांनी दिग्दर्शनातही आजमावलं नशीब, 5 व्या नावाचा विचारही केला नसेल

बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांनी अभिनयात यश मिळवूनही दिग्दर्शनाची धुरा सांभाळली. ऋषी कपूर, आमिर खान, अनुपम खेर, या कलाकारांच्या दिग्दर्शनाबद्दल तुम्ही ऐकलं असेल पण काही असेही अभिनेते आहेत, ज्याचं नाव वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. अभिनयासोबतच दिग्दर्शन क्षेत्रातही त्यांनी आपले कौशल्य सिद्ध करत नवे अध्याय लिहिले. चला जाणून घेऊया, कोण आहेत ते कलाकार ?

| Updated on: Mar 04, 2026 | 1:50 PM
1 / 8
वर्षानुवर्षे पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवूनही, काही कलाकार समाधानी नसतात आणि पडद्यामागे दिग्दर्शनाकडे वळतात. हिंदी चित्रपटसृषटीत काही अभिनेते असेही आहेत, ज्यांची पावलं एकेकाळी दिग्दर्शनाकडे वळली. अनेकांनी चित्रपट दिग्दर्नशात नशीब आजमावून पाहिलं. चला जाणून घेऊया, तुमचा आवडता अभिनेता यात आहे का ? ( PHotos : Social Media)

वर्षानुवर्षे पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवूनही, काही कलाकार समाधानी नसतात आणि पडद्यामागे दिग्दर्शनाकडे वळतात. हिंदी चित्रपटसृषटीत काही अभिनेते असेही आहेत, ज्यांची पावलं एकेकाळी दिग्दर्शनाकडे वळली. अनेकांनी चित्रपट दिग्दर्नशात नशीब आजमावून पाहिलं. चला जाणून घेऊया, तुमचा आवडता अभिनेता यात आहे का ? ( PHotos : Social Media)

2 / 8

ऋषी कपूर हे उत्तम अभिनेते तर होते, पण त्यांनी चित्रपटाच दिग्दर्शन केलं होतं हे तुम्हाला माहीत आहे का ? अभिनयात अनेक वर्षे घालवल्यानंतर दिग्दर्शनात पाऊल ठेवले. 1999 साली ऋषी यांनी अक्षय खन्ना आणि ऐश्वर्या राय अभिनीत "आ अब लौट चलें" हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी कधीही कॅमेऱ्याच्या मागे पाऊल ठेवले नाही.

3 / 8

अभिनेता सनी देओलने दिग्दर्शन केलेला चित्रपट म्हणजे "दिल्लगी". या चित्रपटाद्वारे त्याने दिग्दर्शनात पदार्पण केलं. त्यामध्ये खुद्द सनी, त्याचा भाऊ बॉबी देओल आणि उर्मिला मातोंडकर यांच्या प्रमुख भूमिका होत्या. एवढंच नव्हे तर नंतर त्याने "घायल वन्स अगेन" हाही चित्रपट दिग्दर्शित केला.

4 / 8

आमिर खान हा केवळ एक उत्तम अभिनेताच नाही तर एक उत्तम निर्माता देखील आहे. "तारे जमीन पर" या चित्रपटातून तो दिग्दर्शकही बनला. हा चित्रपट मुलांमधील डिस्लेक्सियावर आधारित होता. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला.

5 / 8

सलमान खानचा धाकटा भाऊ अरबाज खानने "दबंग 2" या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटात सलमान आणि सोनाक्षी सिन्हा मुख्य भूमिकेत होते. "दबंग" हा त्याचा प्रीक्वल होता, ज्याचा अरबाज हा निर्मात होता.

6 / 8

उत्तम अभिनेता म्हणून स्वतःची ओळख निर्माण केल्यानंतर, अजय देवगणनेही दिग्दर्शनामध्ये नशीब आजमावून पाहिलं. अजयने "यू, मी और हम" या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, त्यात त्याची व काजोलची प्रमुख भूमिका होती. तसेच "शिवाय" चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यानेच केलं.

7 / 8

यशस्वी अभिनय कारकिर्दीनंतर, अनुपम खेर यांनी 2002 साली अनिल कपूर, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या "ओम जय जगदीश" या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यानंतर अनुपम यांनी दिग्दर्शनातून निवृत्ती घेतली.

8 / 8

नाना पाटेकर यांनी 1991 साली "प्रहार" या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले, ज्यामध्ये त्यांनी एका लष्करी अधिकाऱ्याची भूमिका केली होती. या चित्रपटात माधुरी दीक्षित हिने प्रमुख भूमिका साकारली होती. त्यानंतर नाना पाटेकर यांनी कोणताही चित्रपट दिग्दर्शित केला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us