
अंकिता लोखंडे ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. अंकिता लोखंडे ही पती विकी जैन याच्यासोबत बिग बॉस17 मध्ये सहभागी झाली होती. पण अंतिम फेरित अंकिताला पराभव स्वीकारावा लागला.

आता अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफन व्हायरल होत आहे. समुद्र किनारी अभिनेत्रीने बोल्ड फोटोशूट केलं आहे.

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे अंकिता हिच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. आजही अनेक चाहते अभिनेत्रीला अंकिता लोखंडे नाही तर, अर्चना याच नावाने ओळखतात.

अंकिता फक्त तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे नाहीतर खासगी आयुष्यामुळे देखील चर्चेत असते. अभिनेत्री कायम एक्स बॉयफ्रेंड आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्याबद्दल बोलत असते.

अभिनेत्री सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर देखील अंकिता हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. चाहते देखील अभिनेत्रीच्या प्रत्येक पोस्टवर लाईक्स आणि कमेंट करत असतात.