‘मी मेकअप आर्टिस्टसोबत रुममध्ये..’, शूटिंगच्या वेळी या अभिनेत्रीसोबत नेमकं काय घडलं?

बॉलिवूड आणि OTT वर आपल्या बोल्ड लुकने धुमाकूळ घालणारी ही अभिनेत्री झाली होती कास्टिंग काउचची शिकार. नेमकं काय घडलेलं?

| Updated on: May 19, 2026 | 4:36 PM
1 / 6
बॉलिवूड आणि OTT विश्वात आपल्या बोल्ड अंदाज आणि दमदार अभिनयामुळे ओळख निर्माण करणारी अभिनेत्री ईशा गुप्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी ती तिच्या एखाद्या प्रोजेक्टमुळे नाही तर तिने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे चर्चेत आली आहे.

2 / 6
कास्टिंग काउचसारख्या गंभीर विषयावर बोलताना ईशाने तिच्या आयुष्यातील काही अनुभव उघड केले असून, तिच्या वक्तव्यामुळे मनोरंजनविश्वात मोठी चर्चा रंगली आहे. एका मुलाखतीदरम्यान तिने सांगितलं की, करिअरच्या सुरुवातीच्या काळात तिलाही कास्टिंग काउचचा सामना करावा लागला होता.

3 / 6
तिने कबूल केलं की तिच्यासोबत अशा प्रकारचे दोन अनुभव आले होते. विशेष म्हणजे एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी तिने एक वेगळीच युक्ती वापरली होती. ती आउटडोअर शूट करत होती. त्या काळात तिला काही गोष्टींबाबत असुरक्षित वाटत होतं. त्यामुळे तिने परिस्थिती हाताळण्यासाठी स्वतःच एक मार्ग शोधला.

4 / 6
अभिनेत्रीने सांगितलं की, तिने निर्मात्यांना आणि संबंधित व्यक्तींना आपण एकटी झोपू शकत नसल्याचं सांगितलं होतं. रात्री भीती वाटते आणि झोप लागत नाही, असं कारण देत ती आपल्या मेकअप आर्टिस्टला रूममध्ये सोबत घेऊन झोपली होती.

5 / 6
तिने सांगितलं की, इंडस्ट्रीमध्ये बाहेरून आलेल्या कलाकारांना अशा परिस्थितीचा अधिक सामना करावा लागतो. कारण फिल्म इंडस्ट्रीतील स्टारकिड्स किंवा मोठ्या घरातील मुलींना कोणी सहज त्रास देत नाही.

6 / 6
त्यांच्या कुटुंबाची ताकद आणि ओळख असल्यामुळे लोक घाबरतात. मात्र, बाहेरून आलेल्या कलाकारांना स्वतःच परिस्थितीचा सामना करावा लागतो असंही तिने स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us