
अभिनेत्री काजोल हिने आता देखील काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हटके ड्रेसमध्ये अभिनेत्रीने फोटोशूट केलं आहे.

सध्या सर्वत्र काजोल हिच्या फोटोंची चर्चा रंगली आहे. फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने लक्षवेधी कॅप्शन देखील लिहिलं आहे.

फोटो पोस्ट करत काजोल म्हणाली, पार्श्वभूमीच्या आवाजामुळे तुम्हाला काय म्हणायचे आहे ते बदलू देऊ नका! तो विनोद असेल तरी काही हरकत नाही...

अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही. अभिनेत्रीने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं.

आजही अभिनेत्री तिच्या सिनेमांमुळे चर्चेत असते. पण आता अभिनेत्री सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेच आली आहे. काजोल सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.