
अभिनेत्री काजोल हिला आज कोणत्याच ओळखीची गरज नाही.. अभिनेत्रीने 90 च्या दशकात दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण आता काजोल बॉलिवूडपासून दूर आहे.

काजोल बॉलिवूडपासून दूर असली तरी, आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता देखील काजोल तिच्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे. पोस्टमध्ये काजोल हिने चाहत्यांना महत्त्वाचा सल्ला दिला.

काजोल हिने इन्स्टाग्रामवर साडीमध्ये काही फोटो शेअर केले आहेत. काळ्यासाडीमध्ये काजोल सुंदर आणि क्लासी दिसत आहे. चाहत्यांना देखील अभिनेत्रीचा लूक आवडलेला आहे. सध्या सर्वत्र काजोल हिच्या लूकची चर्चा सुरु आहे.

काळ्या साडीमध्ये फोटो पोस्ट करत काजोल हिने कॅप्शनमध्ये विचित्र, क्रूर आणि दयाळू व्हा... आणि ज्यांना वाटतं की ते तुम्हाला ओळखतात त्यांना गोंधळात टाका... असं लिहिलं आहे. ज्यावर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.

काजोल कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.