
आलिया भट्ट आणि कतरिना कैफ या दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. मात्र, रणवीर कपूर याच्यासोबत आलियाने लग्न केल्यानंतर त्या फार जास्त एकत्र दिसल्या नाहीत. मात्र, त्यांची मैत्री अजूनही असल्याचे सांगितले जाते.

काही दिवसांपूर्वीच कतरिना कैफ आणि आलिया भट्ट या एका शोमध्ये पोहोचल्या होत्या. यावेळी काही मोठे खुलासे करण्यात आले. कतरिना कैफ म्हणाली की, मी रात्री दोन ते तीनच्या दरम्यान आलियाला मेसेज केला.

मला इंस्टाग्रामला काहीही समस्या आली की, मी आलियाला विचारत असत. मी इंस्टावर एक फोटो शेअर केला, पण त्याची साईज व्यवस्थित बसत नव्हती.

मी आलिया हिला दोन ते तीनमध्ये मेसेज करून तो फोटो कसा व्यवस्थित शेअर करायचा हे विचारले. विशेष म्हणजे तिने देखील एवढ्या रात्री माझ्या मेसेजला प्रतिसाद दिला.

त्यानंतर माझ्या लक्षात आले की, रात्रीचे दोन वाजून गेले आहेत. कतरिना कैफ हिच्या या विधानाची जोरदार चर्चा देखील रंगताना दिसली होती.