एका आयटम साँगमुळे संपलं असतं माधुरीचं करिअर, बाळासाहेबांनी मिटवलेलं प्रकरण काय?

Madhuri Dixit: बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या एका गाण्याने देशभरात गदारोळ माजला होता. दूरदर्शनवर आणि ऑल इंडिया रेडिओने तर या गाण्यावर बंदी घातली होती. शेवटी माधुरी कोर्टात गेली आणि बाळासाहेबांच्या मदतीने हे प्रकरण मिटवले.

| Updated on: Oct 07, 2025 | 12:47 PM
1 / 11
बॉलिवूडमधली अशी अनेक गाणी आहेत जी प्रदर्शित होऊन अनेक वर्ष उलटले आहेत. तरी देखील चाहते आजही तितक्याच आनंदाने ते ऐकत असतात. आजकाल तर जुन्या अनेक गाण्याचा रिमेकही केला जातो. पण तुम्हाला माहिती आहे का एका गाण्यामुळे देशभरात खळबळ माजली होती.

2 / 11
तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की त्यावेळी या गाण्यामुळे संपूर्ण टीमला कोर्टात जावे लागले होते. तसेच या गाण्यावर दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओने बंदी घातली होती.

3 / 11
तुम्ही विचार करत असाल असे कोणते गाणे आहे? हे गाणे 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'खलनायक' सिनेमातील आहे.

4 / 11
'खलनायक' सिनेमातील  चोली के पीछे क्या है हे गाणे सुपरहिट ठरले होते. दिग्दर्शक सुभाष घई यांच्या या सिनेमात माधुरी दीक्षित, संजय दत्त आणि जॅकी श्रॉफ हे महत्त्वाच्या भूमिकेत होते.

5 / 11
या चित्रपटाने त्यावेळी बक्कळ कमाई केली होती. 4 कोटी रुपये बजेट असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 21 कोटी रुपये कमावले होते. पण चित्रपटातील गाण्याने मात्र खळबळ माजवली होती.

6 / 11
'चोली के पीछे क्या है' हे गाणे अलका याज्ञिक आणि इला अरुण यांनी गायले आहे. पण गाण्याच्या शब्दांवरुन लोकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात होता. अनेकांनी यावर आक्षेप घेतला होता.

7 / 11
हे गाणे अश्लील आणि महिलांचा अपमान करणारे  असल्याचा अरोप करत अनेकांनी तक्रारी केल्या होत्या. या गाण्यावरुन वाद इतका टोकाला गेला की हे प्रकरण थेट न्यायालयात गेले होते.

8 / 11
सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातून हे गाणे काढून टाकावे अशी मागणी अनेकांनी केली होती. तसेच विकल्या गेलेल्या कॅसेट पर मागून घ्याव्यात असेही म्हटले होते. पण कोर्टाने या गाण्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे सांगत हे प्रकरणाला पूर्णविराम दिला होता.

9 / 11
कोर्टाच्या या निर्णयानंतर ही हे प्रकरण पेटले होते. तेव्हा माधुरीच्या मदतीला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आले होते. त्यांनी  "या गाण्यात काहीही अश्लील नाही, त्यामुळे विरोध करणे बंद करा," असे स्पष्ट मत व्यक्त केले होते.

10 / 11
इतके झाल्यानंतरही दूरदर्शन आणि आकाशवाणीने या चित्रपटाच्या गाण्यावर मात्र बंदी कायम ठेवली होती. त्यामुळे हे गाणे टीव्ही आणि रेडिओवर बराच काळ ऐकायला मिळाले नाही.

11 / 11
काही दिवसांपूर्वी या गाण्य़ाचा रिमेक देखील आला होता. हा रिमेक क्रू चित्रपटात दाखवण्यात आला होता. या चित्रपटात करीन कपूर खान, तब्बू आणि क्रिती सेनॉन मुख्य भूमिकेत होत्या.