श्रीदेवींचे कधीच न पाहिले फोटो… सुपरस्टार झाल्यानंतर बदलेला अभिनेत्रीचा लूक… तिसरा फोटो पाहून तर म्हणाल…
बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी 24 फेब्रुवारी 2018 मध्ये अखेरचा श्वास घेतला... दुबईत एका लग्नसोहळ्यासाठी गेलेल्या श्रीदेवी पुन्हा भारतात परतल्याच नाही. आता तर त्यांचा मृतदेह... अनेक वर्ष बॉलिवूडमध्ये काम केलेल्या श्रीदेवी यांच्या सौंदर्यावर लाखो चाहते फिदा होते. पण त्यांचे असे काही फोटो आहेत जे सहसा कोणी पाहिलेच नसतील

श्रीदेवी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 मध्ये तामिळनाडू येखील छोट्या गावात झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अय्यपन आणि आईचं नाव राजेश्वरी असं होतं... वयाच्या 6 व्या वर्षीच श्रीदेवी यांनी अभिनय करण्यास सुरुवात केली...

श्रीदेवी यांचं फिल्मी करियर दक्षिण भारतीय सिनेमातून सुरु झालं. त्यांनी तमिळ, तेलुगू आणि मल्याळम सिनेमांमध्ये काम केलं आणि अनेक पुरस्कार जिंकले. 1971 मध्ये 'मूव्ही पूंबट्टा' या मल्याळम सिनेमासाठी त्यांना केरळ राज्य चित्रपट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

तेव्हा श्रीदेवी यांना एक गोष्ट कळली आणि ती म्हणजे, अभिनय फक्त भाषेवर आधारित नसते तर, चेहऱ्यावरील भाव आणि मेहनत देखील तितकीच गरजेची आहे. त्यानंतर श्रीदेवी यांनी कधीच मागेवळून पाहिलं नाही. आज त्यांना कोणत्याच ओळखीची गरज नाही.

श्रीदेवी यांनी 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सोलहवां सावन' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्यांना लोकप्रियता 'हिम्मतवाला' सिनेमातून मिळाली... श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने आणि डान्सने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं..

श्रीदेवी यांनी त्यांच्या करियरमध्ये एकापेक्षा एक भूमिका साकारल्या. 'चालबाज' सिनेमात त्यांनी डबल रोल केला. 'सदमा' आणि 'चांदनी' सिनेमाने विक्रम रचला... श्रीदेवी यांना अनेक पुरस्कारांनी देखील सन्मानित करण्यात आलं.. 2013 मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री देऊन सन्मानित केले.