एका सीनसाठी 3 दिवस Kiss करत होता अभिनेता, 47 रिटेक, कॅमेऱ्यासमोर थरथर कापत होती अभिनेत्री

एका सिनेमाच्या शुटिंग वेळी अभिनेत्याने तीन दिवस किसिंग सीन शूट केला होता. या सीनसाठी जवळपास 47 रिटेक घेण्यात आले होते. आता हा सिनेमा कोणता? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला जाणून घेऊया...

| Updated on: Mar 14, 2026 | 4:24 PM
1 / 6
चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना अनेक गोष्टींची चर्चा सुरु असते. कधी अभिनेता आणि अभिनेत्रीचे सेटवर भांडण होते. तर कधी काही सीन शूट करताना त्यांचा एकमेकांवरील ताबा सुटतो. सध्या अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. त्याने 3 दिवस किसिंग सीन शूट केला. आता हा अभिनेता कोण होता? ती अभिनेत्री कोण होती? चला जाणून घेऊया...

चित्रपटाचे शुटिंग सुरु असताना अनेक गोष्टींची चर्चा सुरु असते. कधी अभिनेता आणि अभिनेत्रीचे सेटवर भांडण होते. तर कधी काही सीन शूट करताना त्यांचा एकमेकांवरील ताबा सुटतो. सध्या अशाच एका अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. त्याने 3 दिवस किसिंग सीन शूट केला. आता हा अभिनेता कोण होता? ती अभिनेत्री कोण होती? चला जाणून घेऊया...

2 / 6

आम्ही ज्या अभिनेत्याविषयी बोलत आहोत तो दुसरा तिसरा कोणी नसून बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान आहे. परफेक्शनसाठी ओळखला जाणारा आमिर त्याच्या प्रत्येक सीनमध्ये उत्कृष्टता आणण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याच्या कारकिर्दीत अनेक किस्से चर्चेत राहिले आहेत, पण एक सीन असा आहे ज्याची चर्चा आजही होत राहते.

3 / 6

'राजा हिंदुस्तानी'मधील तो आयकॉनिक किसिंग सीन आहे. धर्मेश दर्शन यांच्या दिग्दर्शनाखाली आलेल्या या चित्रपटात आमिर खान आणि करिश्मा कपूर यांच्या जोडीने प्रेक्षकांचे मन जिंकले. चित्रपटातील गाणी, केमिस्ट्री आणि विशेषतः एक लांब किसिंग सीन यामुळे तो त्या काळातील सर्वाधिक धाडसी आणि यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरला. हा सीन जवळपास एक मिनिट लांबीचा होता, जो पडद्यावर खूप नैसर्गिक आणि रोमँटिक दिसतो, पण त्याचे शूटिंग मात्र अत्यंत कठीण होते.

4 / 6

उटी येथे फेब्रुवारी महिन्यातील कडाक्याच्या थंडीत हा सीन शूट करण्यात आला. जोरदार वारे, गोठवणारी थंडी आणि थंड पाणी, या सर्व परिस्थितीत आमिर आणि करिश्मा यांना सलग तीन दिवस (सकाळी ७ ते संध्याकाळी ६ पर्यंत) काम करावे लागले. करिश्मा कपूरने एका जुन्या मुलाखतीत सांगितले होते की, "तीन दिवस आम्ही थरथर कापत होतो. प्रत्येक टेकनंतर आम्ही 'कधी संपेल हा किसिंग सीन?' असे विचारत होतो. थंडी आणि वाऱ्यामुळे सेटवरचं वातावरण खूप अवघड होते."

5 / 6

परफेक्ट शॉट मिळवण्यासाठी आमिर खानच्या परफेक्शनिझममुळे हा सीन तब्बल ४७ वेळा रिटेक करण्यात आला. दोघेही घाबरलेले आणि अवघडलेले होते, कारण हा करिश्मासाठी पडद्यावर पहिलाच किसिंग सीन होता. दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी नंतर सांगितले की, करिश्माची आई बबीता कपूर या तीनही दिवस सेटवर उपस्थित होत्या, ज्यामुळे करिश्माला थोडा आधार मिळाला.

6 / 6

शेवटी जेव्हा परिपूर्ण टेक मिळाला, तेव्हा दोघांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. या सीनने चित्रपटाच्या यशात महत्त्वाची भूमिका बजावली आणि आजही तो बॉलिवूडच्या इतिहासातील सर्वात चर्चित रोमँटिक सीनपैकी एक मानला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us