
बाॅलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांचा मुलगा लव सिन्हा हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. नुकताच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये लव सिन्हा याने मोठे खुलासे केले आहेत.

लव सिन्हा म्हणाला की, मी अजूनही बाॅलिवूडमध्ये संघर्ष करत आहे. मी अनेक ठिकाणी ऑडिशन दिल्या आहेत आणि देत आहे. ऑडिशन दिल्यानंतरही मला काम मिळत नाही.

पुढे लव सिन्हा म्हणाला की, माझी बहीण सोनाक्षी सिन्हा हिला अजिबात संघर्ष करण्याची वेळ आली नाही. विशेष म्हणजे बाॅलिवूडच्या पहिल्याच चित्रपटामध्ये ती स्टार झाली.

विशेष म्हणजे सोनाक्षी सिन्हा हिला बाॅलिवूडच्या चित्रपटामध्ये काम मिळावे, यासाठी अजिबातच माझ्या वडिलांनी प्रयत्न केला नाही. इतकेच नाही तर त्यांनी कधीच तिला चित्रपटात घ्यावे म्हणून फोन वगैरे केले नाही.

सोनाक्षी सिन्हाच्या तुलनेत मला खूप जास्त संघर्ष हा करावा लागत असल्याचे सांगताना लव सिन्हा हा दिसला. सोनाक्षी सिन्हा हिची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर आहे.