
कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 सुरू झाला आहे. यंदा ही या सोहळ्याची 77 वी आवृत्ती आहे. येथे देश-विदेशातील सेलिब्रिटी रेड कार्पेटवर त्यांचा जलवा दाखवतात. कान्स फिल्म फेस्टिव्हल 2024 मध्ये आदिती रॉय हैदरीपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत कलाकार सहभागी होणार आहेत. आजपर्यंत अनेक स्टार्सनी जलवा दाखवला.

बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या राय बच्चन कितीतरी वर्षांपासून कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होत आली आहे. रेड कार्पेटवर सिल्व्हर गाऊनमध्ये ऐश्वर्याचा लूक एकदम वेगळा दिसला. तिच्या गाऊनमध्ये ॲल्युमिनियम डिटेलिंग होते.

ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये अनुष्का शर्माचा लूक खूपच आकर्षक दिसला. अनुष्का शर्माने न्यूड मेकअपसोबत मॅचिंग ॲक्सेसरीज घातल्या होता. तिने हातात अनेक अंगठ्याही घातल्या होत्या.

माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लरनेही रेड कार्पेटवर पदार्पण केले होते. तिने स्नो व्हाइट ब्राइडल गाऊन घातला होता. त्यासोबत तिने ग्रीन नेकलेसही घातला. अभिनेत्रीची स्लीक हेअरस्टाईल खूप सुंदर दिसली.

सारा अली खाननेही कान्समध्ये पदार्पण केले . कान्समधील रेड कार्पेटवर तिने पारंपरिक लेहेंगा परिधान केला होता. तिच्या पेस्टल लेहेंग्यात हेवी डिटेलिंग होते. या लूकमध्ये अभिनेत्रीने कमीत कमी ॲक्सेसरीज घातल्या होत्या.