भारतातील ‘मिनी कश्मीर’, सौंदर्य पाहून प्रेमात पडाल, मे महिन्यातही तिथे वाजते थंडी, कुठे आहे हे ठिकाण?
उन्हाळा संपण्यासाठी आता काहीच दिवस उरले आहेत. अशातच जर तुम्हाला सुट्टी संपण्याच्या आधी एखाद्या ठंड हवेच्या ठिकाणी भेट देयची असेल तर हे ठिकाण आहे सर्वात बेस्ट. पर्यटकांची असते प्रचंड गर्दी. कुठे आहे हे ठिकाण?

मे महिना संपण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता जर तुम्हाला सुट्टी संपण्याआधी एखाद्या हिल स्टेशनला भेट देयची असेल तर भारतातील हे ठिकाण आहे सर्वात बेस्ट. जेथे गेल्यावर पुन्हा परत येण्याची होत नाही इच्छा.

छत्तीसगड राज्य आपल्या समृद्ध नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. येथील डोंगररांगा, दाट जंगलं आणि ऐतिहासिक स्थळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतात. अशाच रमणीय ठिकाणांपैकी एक म्हणजे चैतुरगड.

कोरबा जिल्ह्यातील उंच पर्वतरांगांमध्ये वसलेले हे ठिकाण ‘छत्तीसगडचे मिनी काश्मीर’ म्हणून प्रसिद्ध झाले आहे. येथील थंड हवामान, हिरवागार परिसर आणि शांत वातावरणामुळे पर्यटकांना अगदी काश्मीरमध्ये आल्याचा अनुभव मिळतो.

समुद्रसपाटीपासून सुमारे 3060 मीटर उंचीवर वसलेल्या चैतुरगडचे हवामान वर्षभर आल्हाददायक राहते. विशेष म्हणजे, संपूर्ण परिसर उन्हाच्या तडाख्याने तापलेला असताना चैतुरगडमध्ये मात्र गारवा अनुभवायला मिळतो. त्यामुळे उन्हाळ्यात पर्यटनासाठी हे ठिकाण पर्यटकांची पहिली पसंती ठरत आहे.

चैतुरगडच्या डोंगरशिखरावर वसलेले देवी महिषासुरमर्दिनीचे प्राचीन मंदिर हे भक्तांसाठी श्रद्धेचे प्रमुख केंद्र मानले जाते. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे दर्शनासाठी येतात. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे मंदिर पर्यटकांना अध्यात्मिक शांततेचा अनुभव देते.