
आज, ७ सप्टेंबर रोजी भाद्रपद महिन्याची पौर्णिमा आहे. ही पौर्णिमा खूप खास आहे. कारण, आजच्याच दिवशी या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण देखील होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार आहे, त्यामुळे त्याचा परिणाम संपूर्ण देशभरात होणार आहे.

वैज्ञानिक दृष्टिकोनातून ग्रहण ही एक खगोलीय घटना मानली जाते, परंतू ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहण हा अशुभ काळ मानला जातो. हे चंद्रग्रहण भारतासह आशिया, न्यूझीलंड, अमेरिका, अंटार्क्टिका यासारख्या ठिकाणीही दिसणार आहे.

हे ग्रहण यावेळी भारतात दिसणार असल्याने त्याचा सूतक काळही असणार आहे. ग्रहणामुळे कोणतेही शुभ किंवा मंगल कार्य केले जात नाहीत. इतकेच नव्हे, या काळात देवी-देवतांची पूजा करणेही निषिद्ध मानले जाते.

चंद्रग्रहणाच्या दिवशी नकारात्मक शक्ती सक्रिय होतात. त्यामुळे या दिवशी देवी-देवतांच्या मूर्ती किंवा मंदिराला स्पर्श करणे टाळावे. म्हणूनच ग्रहणापूर्वी घरातील पूजास्थान लाल किंवा पिवळ्या रंगाच्या कापडाने झाकून ठेवावे.

देवतांची पूजा-अर्चना बंद असताना, चंद्रग्रहणाच्या दिवशी तुळशीच्या रोपाला आणि पीपळ, वडाच्या झाडांना स्पर्श करणेही टाळावे. धार्मिक मान्यतांनुसार, असे केल्याने दोष लागू शकतो.

या चंद्रग्रहणाच्या दिवशी तुम्ही टोकदार वस्तू जसे की चाकू, सुई, कात्री यांचा वापर करणेही टाळावे. या काळात या वस्तूंना स्पर्श करणे अशुभतेचे लक्षण मानले जाते.

धार्मिक उपाय केल्याने नकारात्मक परिणामांपासून बचाव होऊ शकतो, जसे की या काळात आपल्या इष्टदेवाच्या मंत्रांचा जप करावा, विशेषतः चंद्र मंत्रांचा उच्चार करावा. मंत्रजप सकारात्मक ऊर्जा प्रदान करतो.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)