
गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक आहेत. त्यातच आता मुंबईतील सर्वात लोकप्रिय चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन सोहळा आज पार पडत आहे.

आता नुकतंच चिंचपोकळीचा चिंतामणीची पहिली झलक समोर आली आहे. मुंबईतील परेल येथील कलागंधा आर्ट्सने ही मूर्ती साकारली आहे. चिंचपोकळीचा चिंतामणीच्या बाप्पाचं देखणं रुप पाहण्यासाठी लाखो भाविकांनी गर्दी केली आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणी हा मुंबईतील १०५ वर्षे जुन्या गणेशमंडळापैकी एक आहे. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाची स्थापना १९२० मध्ये करण्यात आली.

आपल्या लाडक्या चिंतामणीचं देखणं रुप भरभरुन पाहता यावं, यासाठी आगमन सोहळ्याला लाखो भक्तांची गर्दी पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडताना दिसत आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणीचे यंदाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा बाप्पा छत्रपती संभाजी महाराज यांच्या रुपात साकारलेला पाहायला मिळत आहे. यात त्याचा शाही थाट दिसत आहे.

चिंचपोकळीचा चिंतामणीच्या आगमनावेळी त्याला लाल रंगाचे धोतर, त्याच रंगाचे शेला परिधान केल्याचे दिसत आहे. त्यासोबच शाही सिंहासनही पाहायला मिळत आहे.