2026 चा फ्लॉप चित्रपट, OTT वर ठरला सुपरहिट, प्रत्येकजण घरी बसून घेतोय कॉमेडीचा आनंद
2026 चा चित्रपट पण बॉक्स ऑफिसवर ठरला फ्लॉप. OTT वर प्रदर्शित होताच ठरला सुपरहिट. प्रचंड कॉमेडी चित्रपट.

ओटीटीवर चित्रपट आणि सिरीज पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी सध्या एक नवीन तेलुगू कॉमेडी-ड्रामा चित्रपट चर्चेत आला आहे.

फंकी हा चित्रपट नुकताच Netflix वर प्रदर्शित झाला असून रिलीज झाल्यानंतर अवघ्या तीन दिवसांतच तो टॉप ट्रेंडिंग यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. हा चित्रपट 13 फेब्रुवारीला थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉक्स ऑफिसवर त्याला फारसे यश मिळाले नाही, मात्र ओटीटीवर प्रेक्षक त्याला पसंती देत आहेत.

चित्रपटाची कथा कोमल या नवोदित दिग्दर्शकाभोवती फिरते. जो आपला पहिला ‘फंकी’ चित्रपट बनवण्याचा प्रयत्न करतो. बजेट वाढल्यामुळे त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि पुढे चित्रा ही व्यक्तिरेखा चित्रपट पूर्ण करण्याची जबाबदारी स्वीकारते. या प्रवासात दोघांमध्ये प्रेमसंबंधही विकसित होतात.

चित्रपटात भरपूर कॉमेडी आणि पंचलाईन्स देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. काही संवाद प्रेक्षकांना खूप हसवतात. मात्र सततची कॉमेडी काही ठिकाणी कंटाळवाणी वाटू शकते.

हलकाफुलका मनोरंजन म्हणून हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे. IMDB वर कमी रेटिंग मिळूनही प्रेक्षक घरी बसून हा चित्रपट एन्जॉय करत आहेत.