‘इट्स ऑल गुड…’ शरद पवारांच्या ४० मिनिटांच्या भेटीनंतर राहुल गांधींचं एका वाक्यात उत्तर! विधानाचा नेमका अर्थ काय?
आमच्यात चर्चा सुरु आहे. सगळं काही ठीक आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्याशी चाळीस मिनिटे चर्चा केल्यानंतर केले आहे.

आमच्यात चर्चा सुरु आहे. सगळं काही ठीक आहे असे वक्तव्य राहुल गांधी यांनी शरद पवार यांच्याशी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात बंद दाराआड चाळीस मिनिटे चर्चा केल्यानंतर केले आहे. राहुल गांधी यांनी आधी दुपारी चेन्नईत माजी मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर ते विमानाने मुंबईत दाखल झाले. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्या चाळीस मिनिटे चर्चा करुन त्यांचे मन जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
विरोधी पक्ष नेते राहुल गांधी चेन्नईवरुन मुंबई दाखल झाले आहेत. त्यांचे मुंबईच्या विमानतळावर आगमन झाल्यानंतर त्यांनी ब्रीच हॉस्पिटल गाठत त्यांची भेट घेतली. डिलिमिटीशन बिलाचे उद्या संसदेत सादर होणार असून त्यावर चर्चेला सुरुवात होईल असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी आणि डीएमके हे एनडीएला या बिलासाठी समर्थन देणार असल्याचे शक्यता आहे. त्यामुळे इंडिया आघाडीतील फूट निर्माण झाल्याचे दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर राहुल गांधी त्यांच्या इंडिया आघाडीच्या सहकाऱ्यांची मनधरणी करण्यासाठी मुंबईत आले आहेत. आधी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी तसेच मल्लिकार्जून खरगे यांनी चेन्नईत एम.के. स्टॅलिन यांची भेट घेऊन त्यांनी मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. आता रात्री उशीरा शरद पवार यांची राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या नेत्यांनी भेट घेतली. यावेळी चाळीस मिनिटे चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे. मात्र, राहुल गांधी यांनी या चर्चेत काय झाले याची स्पष्ट उत्तर नेता थोडक्यात लढाई सुरु असून इट्स ऑल गुड…असे त्रोटक उत्तर देत अधिक बोलणे टाळले आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
