
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' या मालिकेतील प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. अरुंधती, अनिरुद्ध, संजना, यश, गौरी, अनघा, अभिषेक या सर्व कलाकारांचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

मालिकेत यशची प्रेयसी आणि होणारी पत्नी गौरीची भूमिका अभिनेत्री गौरी कुलकर्णी साकारतेय. गौरी खऱ्या आयुष्यात खूप ग्लॅमरस असून इन्स्टाग्रामवर ती तिचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते.

गौरीने नुकताच फोटोशूट केला असून 'समर लूक'मधील हे फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

निळ्या रंगाचा ड्रेस तिने परिधान केला असून त्यावर पांढरे शूज तिने घातले आहेत.

गौरीचा हा 'समर लूक' चाहत्यांना खूपच आवडला असून तिच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

'फारच क्यूट दिसतेयस' असं म्हणत चाहत्यांनी गौरीच्या या लूकचं कौतुक केलं आहे.

मालिकेत अरुंधती आणि संजनाची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर आणि रुपाली भोसले यांच्यासोबत गौरीची चांगली मैत्री झाली आहे.