
'स्वातंत्र्यवीर सावरकर' हा सिनेमा 22 मार्चला रिलिज झाला. अभिनेता रणदीप हुड्डा याने या सिनेमात स्वातंत्र्यवीर सावरकर ही प्रमुख भूमिका साकारली आहे. तर याच सिनेमात अभिनेत्री अंकिता लोखंडे हिने सावरकरांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.

सावरकरांच्या पत्नी यमुनाबाई सावरकर यांची भूमिका अंकिताने या सिनेमात केली आहे. हे पात्र साकारण्यासाठी अंकिताने विशेष मेहनत घेतली आहे. पेहरावापासून ते तिच्या बोलण्याच्या लहेजातही ती मेहनत दिसते.

या सिनेमातील कामासाठी अंकिताने किती पैसे घेतले असतील? तर याचं उत्तर नाही असं आहे. अंकिताने या सिनेमासाठी एकही रूपया मानधन घेतलेलं नाही. त्यामागे कारण काय? पैसे न घेण्याचं कारणही तिने सांगितलं.

'स्वातंत्र्यवीर सावरकर' या सिनेमाचे निर्माते संदीप माझे चांगले मित्र आहेत. हा सिनेमा घेऊन ते माझ्याकडे आले. तेव्हा सिनेमाच्या बजेटचं टेन्शन त्यांना होतं. तेव्हा मी ठरवलं की यांना साथ देऊयात... त्यामुळे मी पैसे घेतले नाहीत, असं अंकिताने सांगितलं.

पवित्र रिश्ता या टीव्ही मालिकेने अंकिताला देशभरात ओळख दिली. 'मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी' या सिनेमात अंकिताने काम केलं आहे. शिवाय बिग बॉस 17 मध्येही अंकिता पती विकी जैनसोबत सहभागी झाली होती.