
सैराट... मराठीतील ब्लॉकबस्टर सिनेमा... या सिनेमाने प्रचंड लोकप्रियता मिळवली. करोडोंचा गल्ला या सिनेमाने जमवला. सिनेमाचे शो हाऊस फुल झाले. त्यामुळे हा सिनेमा इतर भाषांमध्येही भाषांतरित झाला.

हिंदीमध्येही हा सिनेमा रिलीज झाला. 'धडक' असं या सिनेमाचं नाव होतं. तसंच कन्नड भाषेतही हा सिनेमा रिलीज झाला. 'मनसु- मल्लिगे' असं सैराटच्या कन्नड सिक्वेलचं नाव होतं.

सैराटच्या कन्नड रिमेकमध्ये रिंकू राजगुरु हिने देखील काम केलं आहे. सैराटमधील 'आर्ची' हे पात्र तिने 'मनसु- मल्लिगे' या कन्नड रिमेकमध्येही साकारलं.

'मनसु- मल्लिगे' या चित्रपटाच्या शुटिंगदरम्यानचा अनुभव रिंकूने आर्ची ही भूमिका मी सैराटमध्ये साकारली होती. पण 'मनसु- मल्लिगे'मध्ये काम करण्याचा अनुभव वेगळा होता. ती भाषा माझ्यासाठी नवी होती, असं रिंकू म्हणाली.

कन्नड भाषा माझ्यासाठी वेगळी होती. माणसं नवी होती. माझ्यासाठी सगळंच नवखं होतं. पण माणसं चांगली होती. त्यामुळे त्यांच्यासोबत शूट करताना खूप मजा आली, असं रिंकूने सांगितलं.