PM Narendra Modi | पुन्हा वर्क फ्रॉम होमची गरज; जागतिक संकटाच्या पार्श्वभूमीवर मोदींचं मोठं आवाहन
जागतिक स्तरावर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम भारतावरही होत असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना इंधन बचत आणि परकीय चलन जपण्याचे आवाहन केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी पेट्रोल आणि डिझेलचा वापर जपून करण्यासह पुढील एक वर्ष सोनं खरेदी टाळण्याचा सल्लाही दिला.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, “युद्धाचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे. त्यामुळे आपल्याला परकीय चलन वाचवण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतील.” त्यांनी नागरिकांना पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करण्याचे, सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य देण्याचे आणि शक्य तिथे कार पूलिंगचा वापर करण्याचे आवाहन केले.
तसेच खाद्यतेलाचा वापर मर्यादित ठेवण्यासह परदेश प्रवासही कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. “कच्च्या तेलाची बचत करणे ही काळाची गरज आहे,” असेही मोदी यांनी नमूद केले. याशिवाय कोरोना काळाप्रमाणे पुन्हा वर्क फ्रॉम होमला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी ऑनलाइन कॉन्फरन्स आणि व्हर्च्युअल मीटिंगचा वापर करा, असं देखील मोदी यांनी सांगितलं आहे. दरम्यान, शेती क्षेत्राबाबत बोलताना पंतप्रधानांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक खतांचा वापर वाढवण्याचे आवाहनही देशवासियांना केले.
Published on: May 11, 2026 11:41 AM
बनावट सही, बनावट वर्क ऑर्डर अन् कोट्यवधींची फसवणूक! कुंभमेळ्याच्या....
झिशान सिद्दीकी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी!
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?