AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MI vs RCB : टीममधल्या राजकारणाच्या प्रश्नावर मुंबई इंडियन्सच्या कोचचं सडेतोड उत्तर, हार्दिक कालही खेळला नाही

MI vs RCB : मुंबई इंडियन्सची टीम सध्या अडचणींचा सामना करत आहे. कालच्या पराभवाने यंदाच्या सीजनमधील त्यांचं प्लेऑफच आव्हान संपुष्टात आलय. आयपीएल 2026 सीजनमधील मुंबई इंडियन्ससाठी कालची पत्रकार परिषद सर्वात कठीण होती.

MI vs RCB : टीममधल्या राजकारणाच्या प्रश्नावर मुंबई इंडियन्सच्या कोचचं सडेतोड उत्तर, हार्दिक कालही खेळला नाही
Mahela JayawardeneImage Credit source: ipl/bcci
| Updated on: May 11, 2026 | 12:36 PM
Share

आयपीएल 2026 सीजनमधील मुंबई इंडियन्ससाठी कालची पत्रकार परिषद सर्वात कठीण होती. टीमचे हेड कोच माहेला जयवर्धने या पत्रकार परिषदेला सामोरे गेले. पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकणाऱ्या मुंबई इंडियन्सची टीम यंदाच्या सीजनमध्ये प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर गेली आहे. मुंबई इंडियन्सचा काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने पराभव केला. शेवटच्या चेंडूवर मुंबईचा पराभव झाला. 11 पैकी 8 सामने मुंबईच्या टीमने गमावले आहेत. जयवर्धने यांना पत्रकार परिषदेत काही कठिण प्रश्नांना सामोरं जावं लागलं. संघर्ष करणाऱ्या स्टार प्लेयरना बेंचवर बसवण्यापासून ते टीममधल्या पॉलिटिक्सवर जयवर्धने यांना विचारण्यात आलं. “हा सीजन निराशाजनक आहे. आम्हाला संधी मिळाल्या. पण आम्ही चांगलं खेळू शकलो नाही. फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही बाबतीत आमच्याकडे सातत्य नव्हतं. प्लेऑफच्या शर्यतीत ज्या टीम्स आहेत, त्यांच्यापेक्षा आम्ही दोन ते तीन विजय लांब राहिलो. आजचं तर उत्तम उदहारण आहे” असं जयवर्धने म्हणाले.

“आम्ही सारखी टीम बदलत होतो, असं मला वाटत नाही. तुम्हाला माहित नसेल, यावेळी आमच्या टीममध्ये अनेकांना दुखापती झाल्या. त्यामुळे जबरदस्ती आम्हाला बदल करावे लागले. आमचे महत्वाचे प्लेयर सतत खेळत होते. पण कारणं देणार नाही. आमच्याकडे दर्जेदार टीम आहे. पण आम्ही चांगला खेळ दाखवू शकलो नाही. आम्हाला चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. चांगलं क्रिकेट खेळा हाच टीमला संदेश आहे” असे जयवर्धने म्हणाले.

हार्दिक पंड्याच्या न खेळण्यामागे काय कारणं?

हार्दिक पंड्या कालच्या सामन्यातही खेळत नव्हता. पाठिच्या दुखण्यामुळे हार्दिक पंड्या मागच्या दोन सामन्यात दिसलेला नाही असं कारण दिलं जातय. काही खेळाडूंचा खराब फॉर्म असूनही त्यांची पाठराखण केली जात आहे. उदहारणार्थ सूर्यकुमार यादव. उपकर्णधार असलेल्या सूर्याने 11 सामन्यात 195 धावा केल्या आहेत.

त्यांना बाजूला करण्याचं काही कारण नाही

फॉर्ममध्ये नसलेल्या सीनियर प्लेयर्सना बेंचवर बसवणं हा राजकीय निर्णय आहे का? यावर जयवर्धने यांनी लगेच नाही असं उत्तर दिलं.”तुम्हाला त्यांची क्वालिटी माहितीय. ते त्यांच्यापरीने सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत होते. ते प्रयत्न करत नाहीयत असं मला दिसलं असतं तर मी त्यांच्याशी बोललो असतो. पण ते त्यांच्याबाजूने सर्वोत्तम करण्याचा प्रयत्न करत होते. रोहितला दुखापत झाली. त्यानंतर पुनरागमन करताना त्याने जबरदस्त बॅटिंग केली. कोर ग्रुप आमच्यासाठी महत्वाचा आहे. तुम्ही त्यात सतत बदल करु शकत नाहीत. आमाचा त्यांच्यावर विश्वास आणि कॉन्फिडन्स आहे. त्यांना बाजूला करण्याचं काही कारण नाही” असं उत्तर जयवर्धने यांनी दिलं.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...