
बॉलिवूड अभिनेत्री मौनी रॉयचे लाखों चाहते आहेत. छोट्या पडद्यानंतर तिनं बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे.

मौनी ही अशीच एक अभिनेत्री आहे जी तिच्या ग्लॅमरस लूकसाठी प्रसिद्ध आहे.

मौनी सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे. ती नेहमीच तिचे खास फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असते.

नुकतंच, मौनीनं क्रॉप टॉप आणि प्रिंटेड स्कर्टमध्ये इन्स्टाग्रामवर तिचे खास फोटो शेअर केले आहेत, हे फोटो चाहत्यांमध्ये अधिकाधिक लोकप्रिय होत आहेत.

तिच्या प्रत्येक फोटोमध्ये मौनी एका वेगळ्या स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. हे फोटो शेअर करत तिनं लिहिलं आहे की एक चांगली व्यक्ती बना, पण हे सिद्ध करण्यात वेळ वाया घालवू नका.

देवोन दे देव महादेव आणि नागिन या मालिकांमधून मौनीला खास ओळख मिळाली.