
कपूर कुटुंब सध्या सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. रिया कपूर आणि करण बूलानी यांचे लग्न 14 ऑगस्ट रोजी पार पडलं. रिया आणि करणच्या लग्नात कपूर कुटुंबानं एकत्र खूप धमाल केली. आता या कुटुंबाला सेलिब्रेशनची पुन्हा एक संधी मिळाली. निमित्त होतं अंतरा मारवाच्या बेबी शॉवरचं.

सोनम कपूरचा चुलत भाऊ मोहित मारवा लवकरच वडील होणार आहे. गोदभराई सोहळ्याचे फोटो कपूर कुटुंबानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना सोनम कपूरनं लिहिलं - अंतरा मारवाच्या बेबी शॉवरसाठी फॅमिली… जान्हवी, हर्षवर्धन, आशिता आणि जहां मिसींग आहेत.

खुशी कपूरनेही तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हे फोटो शेअर केले आहेत. फोटो शेअर करताना तिने लिहिलं – फॅमिली फर्स्ट.

सोनम आणि खुशीनंतर शनाया आणि अर्जुन कपूर देखील फोटो शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. अनेक फोटो शेअर करत शनायाने लिहिले - हॅपी.

फोटोंमध्ये कपूर कुटुंब पारंपरिक अवतारात खूप सुंदर दिसत आहे. अंशुला, सोनम, शनाया, खुशी, रिया, करण बूलानी, अर्जुन कपूर, मोहित मारवा आणि अंतरा मारवा फोटोमध्ये दिसत आहेत.